चिखलठाण येथील युवक व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता केली आहे या साठी अक्षय सरडे,आप्पा रोकडे,अमोल रोकडे,सचिन मोरे,आनंद कळसाईत, शहाजी रोकडे,दादा पिसाळ,विश्वजीत रोकडे,संदीप लोंढे,शुभम भोगे,बापुराव राउत, शिवाजी परिट,सुशांत विभुते ,हनुमंत सरडे,विकास गव्हाणे, रणजित गव्हाणे, शहाजी सरडे,अजीत गव्हाणे, विशाल उंबरे, नाना सुपेकर या युवकांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले.
शालेय जीवन आठवले की सर्व बालपणीचे मित्र आठवतात. त्यांच्याबरोबर धमाल, मस्तीमध्ये घालवलेले दिवस आठवतात. ते आपुलकीने शिकवणारे शिक्षक, मित्रमैत्रिणीबरोबर मधल्या सुट्टीत संपवणारा डबा आणि लगेच हातात हात घालून पकडापकडी खेळण्याची घाई, हे सगळे आठवते. ज्या शाळेत बालपण गेले, मौज मस्ती केली व शिक्षण भविष्याचा पाय मजबूत केला त्या शाळेबद्दल प्रत्येकाच्या मनात वेगळीच आपुलकी व ओढ आसती कितीही मोठे झाले तरी गावी आल्यावर आपण लहानपणी शिकलेल्या शाळेला भेट देण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात असते
परंतु सध्या लाॅकडाऊन मुळे गेल्या वर्षभरात अनेक शाळा उघडल्या नाहीत ,उघडल्या तरी फक्त कोविड सेंटर साठीच उघडल्या गेल्या ,विद्यार्थ्यी नसल्याने शाळा देखील मुक्या झाल्यासारख्या झाल्या आहेत , शाळेतील विद्यार्थी झांडांची, रोपांची काळजी घेतात मात्र सध्या विद्यार्थी नसल्याने शाळा देखील कळा गेल्या सारख्या झाल्या आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.