loader
Breaking News
Breaking News
Foto

माॅर्नींग वाॅक करत असताना वाहनाची धडक, वडशिवणे येथील विजय काकडे यांचा जागीच मृत्यु

करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील विजय काकडे हे माॅर्नींग वाॅक साठि गेले असता अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने जागीच ठार झाले आहेत .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

बाबत सविस्तर वृत्त असे कि वडशिवणे येथील विजय बाबुराव काकडे वय ४८वर्ष अजित दादा पवार विदयालय वडशिवणे येथे सेवक पदावर काम करीत होते नेहमीप्रमाणे सकाळी ४ते५च्या दरम्यान वडशिवणे रोडवर माॅर्नींग वाॅक साठि गेले असता अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली त्या मध्ये ते जागीच ठार झाले आहेत.

संजय जाधव (✍चौफेर प्रतिनिधी केम)

या बाबत निळू लोंढे यानी करमाळा पोलीसात तक्रार दिली आहे अज्ञात वाहना विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तपासे हे करीत आहे . या घटनेने वडशिवणे गावावर शोककळा पसरली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts