loader
Breaking News
Breaking News
Foto

लाॅकडाउन काळात पुर्व भागात अवैध धंद्यात प्रचंड वाढ प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष ?

ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रचंड फैलाव होताना दिसत आहे ,मास्क, सामाजिक अंतर, सॅनीटायझर या त्रिसुत्रीचा विसर पडल्याने कोरोना वाढत असून कोरोनाच्या या वाढीस ग्रामीण भागात लाॅकडाऊन असताना देखील सुरु असलले अवैध व्यवसाय कारणीभूत असल्याचे समोर येत आहे ,कारण कडक लाॅकडाऊन असताना सुद्धा पुर्व भागातील अनेक गावात खुलेआम बेकायदेशीर दारु विक्री सुरु आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कडक लाॅकडाऊन असताना अनेक गावात हातभट्टी, डुप्लिकेट दारु विक्रेते खुलेआम पण दारु विक्री करत आहेत ,या ठिकाणी कोणतेच नियम पाळले जात नसुन परिसरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात दारु पिण्यासाठी गावात ये जा करत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका प्रचंड वाढला आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

अनेक हाॅटेल,ढाब्यावर चोरी चुपे ,तर काही ठिकाणी खुलेआम दारु विक्री होत आहे ,लाॅकडाऊन च्या नावाखाली, शेतकरी, भाजी विक्रेते यांना हजारो रुपये दंड आकारातना अवैध धंदेवाले यांच्यावर कारवाई करताना बिट हवालदार यांचे हितसंबंध आडवे येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे,गावात सुरु असलेल्या या अवैध धंदे वाल्यांवर ग्रामपंचायत, अपत्ती व्यवस्थापन, पोलीस पाटील ते बिट हवालदार यांचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याने दारु विक्रत्यांची दादागीरी वाढली आहे ,दारु बंद ठेवा अशी विनंती करण्यास गेलेल्या युवकांना धक्काबुकी, शिवीगाळ करण्यापर्यंत दारु विक्रेत्यांची मजल गेली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गावातच दारु उपलब्ध होत असल्याने अनेक जण दारुच्या आहरी गेले आहेत, आनेकांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत, अनेक युवकांना दारुची व्यसनाची चटक लागत आहे तसेच डुप्लिकेट दारु उपलब्ध होत असल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी पोलीस प्रशासन,व दारुबंदी विभागाने जातीने लक्ष घालून किमान कोरोना कालावधी संपेपर्यंत तरी धंदे बंद करावेत आशी मागणी नागरिकांतून होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts