loader
Breaking News
Breaking News
Foto

जयंत पाटील यांची उजनीच्या पाण्याच्या संदर्भातील भूमिका ही संदिग्ध , स्पष्ट आदेश काढावा -अमरजित साळुंके

जयंत पाटील यांची उजनीच्या पाण्याच्या संदर्भातील भूमिका ही संदिग्ध असुन , उजनीचे पाच टि एम सी पाणी इंदापूर देण्याचा प्रकल्प रद्द केल्याचा स्पष्ट शासन आदेश काढावा आशी मागणी भाजापा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके सा चौफेर शी बोलताना केली आहे. या बाबत त्यांनी रितसर प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, काल राज्याचे मंत्रीमहोदय जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उजनीचे ५ टीएमसी पाणी शेटफळ गडे (इंदापूर) योजनेसाठी नेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे असे जाहीर करत असताना त्यांनी केलेले वक्तव्य हे संदिग्ध आणी फिरवाफिरवी करणारे आहे, शासन निर्णय हा स्पष्टपणे असावा अन्यथा तीव्र रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा भाजपाचे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सन्मानीय पाटील साहेब सतत फक्त सोलापूर च्या पाण्याला धक्का लावला नसल्याचे सांगत आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगावे की उजनीचे (सोलापूरचे नाही) ५ टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. पाटील साहेब हुशार आहेत त्यांना मंत्रिमंडळाचा व कार्याचा दिर्घ अनुभव आहे, सहजच ते सर्वसामान्य जनतेला त्यांच्या शब्दांच्या खेळात फिरवू शकतात परतू सोलापूर जिल्ह्यातील जनता फार हुशार आहे ती असल्या भूल थापाना बळी पडत नाही. सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा उजनीच्या पाण्यासाठीचा विरोध पाहता जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना देखील नाईलाजास्तव का होईना पाणी पळविण्याच्या विरोधात पत्रकबाजी तरी करावी लागली. त्यामुळेच स्पष्ट आदेश निघावा की उजनी धरणातील संपूर्ण पाणी वाटप यापूर्वीच झालेले असल्याने आता उजनीतील ५ टीएमसी 'सांडपाणी' पाणी उचलण्याचा 'शासन निर्णय' रद्द करण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यापुढेही संपूर्ण सोलापूर जिह्यातील जनता,धरणग्रस्त, शेतकरी एकी दाखवेलच, परंतु राज्यकर्ते नेतेमंडळींनी असा सत्तेचा दुरुपयोग करत काही जणांना हाताशी धरून जनतेच्या भावनेशी खेळ खेळू नये. अन्यथा उजनीच्या पाण्यासाठी पुन्हा पुन्हा तीव्र लढा उभारला जाईल असा इशाराही भाजपा सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts