loader
Breaking News
Breaking News
Foto

'दादाश्री 'फांउडेशन चे कार्य कौतुकास्पद- पोलीस निरीक्षक - सूर्यकांत कोकणे

विट ता करमाळा येथील दादाश्री फांउडेशन चे कार्य कौतुकास्पद असुन फांउडेशन चे अध्यक्ष काका काकडे हे सामान्य कुटुंबातील असुन सुद्धा खाकी वर्दी वरील प्रेमापोटी सर्व पोलीसांना स्वखर्चाने मास्क व सॅनीटायझर वाटप करत आहेत हे खूप कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार करमाळा पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी काढले आहेत .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

माजी पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाश्री फांउडेशन च्या वतीने पोलीसांना सॅनीटायझर बाॅटल,व मास्क चे वाटप करण्यात आले त्यावेळी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे बोलत होते. या वेळी अधीक बोलताना पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे म्हणाले की एखादा अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील लोकं त्यांच्यावर प्रेम करतात हे खूप अभिमानास्पद आहे. प्रत्येक पोलीस कर्मचारी व आधिकाऱ्यांना जनतेच्या मनात जागा निर्माण करता आली पाहीजे असे ते म्हणाले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी फांउडेशन चे कार्य व उद्दिष्ट सांगताना समाजोपयोगी काम करण्यास आम्ही कधीही तयार आहोत आसे फांऊडेशनच्या अघ्यक्षा सौ अंजली काका काकडे यांनी सांगीतले, सचीव काका काकडे यांनी सर्वाचे स्वागत केले या वेळी उपाध्यक्ष माधव जाधव,पांडूरंग खैरे , जिल्हा परीषद सदस्य संतोष वारे, युवा सेना तालुका समन्वयक व पत्रकार शंभुराजे फरतडे उपस्थित होते .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पोलीस निरीक्षक सुर्याकांत कोकणे यांनी या अभिनव उपक्रमाचे खुप कौतुक केले तसेच भविष्यातील उपक्रमास शुभेच्छा दिल्या संस्थेची कुठलीही आडचण आसल्यास मदत करण्याचे आश्वासन हि दिले.कार्यक्रमासाठी सर्व पोलीस कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts