शिवसेनेच्या सोलापूर व धाराशीव गडाची जबाबदारी पुन्हा माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या शिरावर सोपवली असून दस्तुरखुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या दै सामाना मधुन हि घोषणा केली असुन उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख म्हणून आमदार तानाजीराव सावंत उद्या पासून सोलापूर व धाराशीव दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सोलापर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांचा बुधवारी आणि गुरुवारी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच पक्षीय, शासकीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे. आमदार सावंत यांच्या दौऱ्याला बुधवारी (दि. १२) पंढरपुरातून सुरुवात होणार असून, सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृहावर ते करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता मोहोळच्या शासकीय विश्रामगृहावर मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर सोलापूर रेस्ट हाउस येथे सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहेत. गुरुवारी (दि. १३) ११.३० परांडा येथील शासकीय विश्रामगृहावर भूम, परांडा, वाशी येथील पदाधिकारी, दुपारी २.३० वाजता धाराशिव शासकीय विश्रामगृहावर कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा येथील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. तर, दुपारी ४.३० वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहेत.
विधान सभा निवडिकीपासुन सावंत पक्षाच्या संघटनात्मक घडामोडींतुन बाजुला होते .विधानसभा निवडणुकीत तानाजीराव सावंत यांनी दिलीप माने, रश्मी बागल, दिलीप सोपल यांना पक्षात आणुन आमदारकीचे टिकिट मिळवून दिले होते टिकिट वाटपात करमाळ्याचे शिवसेना विद्यमान आमदार नारायण आबा पाटील, व जिल्हा प्रमुख महेश कोठे यांचा पत्ता कट करुन रश्मी बागल, व दिलीप माने यांना दिलेली उमेदवारी वादाचा विषय ठरली होती. आमदार सावंत यांनी जिल्यात राबवलेला प्रयोग अयशस्वी ठरला होता ,त्या मुळेच करमाळा ,व सोलापूरातील हक्काच्या दोन जागा गमवाव्या लागल्या असा सुर जिल्ह्यातील सेना पदाधिकाऱ्यांतुन व्यक्त केला जात होता . .भाजपासोबत सरकार झाल्यास जलसंधारण खात्याचा कार्यभार संभाळला असल्याने उपमुख्यंमत्री पदासासाठी चर्चेत असलेले तानाजीराव सावंत यांना महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळातुन अनपेक्षित रित्या डच्चु देण्यात आला त्यानंतर तानाजीराव सावंत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या बरोबर चर्चा केली मात्र मिडीया ट्रायल करुन सावंत यांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न झाला याचा संधीचे सोने करत सावंत नको अशी भुमीका घेतलेल्या व सावंत यांच्या एंट्री मुळे बॅकफूटवर गेलेल्या काही पदाधिकाऱ्यांकडून फ्रंटफुट वर येत सावंत यांना टार्गेट केले गेले ,सावंत यांच्या विरोधात जाहीर पोस्टरबाजी केली ,पक्षा कडुन देखील या पदाधिकाऱ्यांना मह्तवाच्या जबाबदाऱ्या देवुन सावंत यांना देखील शह देण्यात आला होता.
त्यानंतर तानाजीराव सावंत यांनी सोलापूर धाराशीव जिल्ह्यातील संघटनाबाधणी कडे दुर्लक्ष केले होते,धाराशीव व सोलापूर जिल्ह्यत उद्धव ठाकरे अल्यांतर देखील उपस्थित राहिले नव्हते , या सगळ्या घडामोडींत तानाजीराव सावंत यांनी एक वेळेस देखील पक्षा च्या व पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या विरोधात एकही शब्द काढला नव्हता उलट सोशेल मिडियावर शिवसेना नेत्यांचे वाढदिवस, अदित्य ठाकरे, उद्धव, ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृतपत्राच्या माध्यमातून जाहिरात देवुन आपण आजही शिवसेनेत असल्याचे दाखवून दिले होते. नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली तानाजीराव सावंत कोरोना च्या संकटावर मात करण्यासाठी बार्शी येथे एकहजार बेड चे अद्ययावत कोविड सेंटर उभारुण हजारो कुटुंबाना दिलासा देण्याचे काम केले असून या कोविड सेंटर चे उद्घाटन ऊद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतले नामदार एकनाथ शिंदे व ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तानाजीराव सावंत व शिवाजीराव सावंत व सावंत परिवाराची उद्धव ठाकरे व शिवसेना पक्षा वर असलेली निष्ठा ,सर्व सामान्य जनते विषयी असलेली तळमळ या मुळे मोठ्या विश्वासाने उद्धव ठाकरे यांनी आमदार तानाजीराव सावंत यांच्याकडे पुन्हा एकदा सोलापूर व धाराशीव जिल्ह्याची जबाबदारी सोपववली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.