loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा उद्योजक लॉबी संभाजीनगर टिम तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

आज रोजी कोव्हिडं काळात रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज पडत असल्याने रक्तासाठा अपुरा पडत आहे , त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर 3 महिने नागरीकांना रक्तदान करता येणार नाही त्यामुळे भविष्यात रक्तपुरवठा सुरळीत रहावा या साठी मराठा उद्योजक लाॅबी राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित करुन सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. मराठा उद्योजक लाॅबी हा ग्रुप नेहमी व्यवसायासाठी अग्रक्रम देणारा ग्रुप आहे .त्या विचारातुनच मराठा तरुणांचे राज्यभर फेसबुकवर संघटन निर्माण झाले असून , मराठा व्यावसायिकांच्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करणे, उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, लागणारे परवाने आणि महत्वाचे म्हणजे व्यवसाया साठी लागणारे भक्कम मानसिक पाठबळ देणारे व्यवसायपीठ म्हणून #mul मराठा उद्योजक लाॅबी ओळखली जाते. त्या साठी टिम च्या माध्यमातून वेळोवेळी व्यवसायीक परिचय मेळावा एक्स्पो अशाप्रकारचे कार्य नेहमीच चालू असते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

परंतु सद्याच्या कोवीड च्या संकट काळामध्ये मराठा उद्योजक लॉबी ने सामाजिक जबाबदारी चे भान ठेवत संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिर प्लाजमा , बेड , इंजेक्शन ,ऑक्सिजन साठी ग्राउंड ला उतरून भरीव कार्य केले आहे त्याचाच भाग म्हणून आज छत्रपती संभाजी नगर मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले त्या मध्ये 79 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला शिबिराची सुरवात राजेंद्र भाऊ औताडे व राहुल भाऊ बारावकर मराठवाडा संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितत झाले तर रक्तदात्यांचे आभार सर्व संभाजीनगर टिम ने व्यक्त केले शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याध्यक्ष जनार्धन साबळे.यांनी परिश्रम घेतले

वैभव फरतडे ✍ (मुंबई प्रतिनीधी)

ऐनवेळी नियोजन करुन देखील व सोशेल मिडियावर केलेल्या आवहास प्रतिसाद देत तब्बल ७९ लोकांनी सहभाग नोंदवल्या बद्दल टिमचे कौतुक होत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बहुसंख्य मराठा बांधव व रक्तदान करणारे उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts