loader
Breaking News
Breaking News
Foto

सकल_मराठा_वैद्यकीय_समिती नाशिक_जिल्हा (महाराष्ट्र राज्य) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद

नाशिक येथे सकल मराठा वैद्यकीय समितीतर्फे रक्तदान शिबिर व प्लाज्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या देशात तसेच राज्यात कोव्हिड-19 या रोगाने प्रचंड हाहाकार मजवला असून या महामारी मूळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील या बाबत चिंता व्यक्त केली असतानाच सकल मराठा वैद्यकीय समिती नाशिकच्या वतीने मुंबई नाका येथील नाशिक ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.या वेळी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात सर्व मराठा संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आजच्या या भयानक स्थिती मध्ये देखील सकल मराठा वैद्यकीय समिती ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सकल मराठा वैद्यकीय समिती नाशिक जिल्हा सर्व मराठा संघटना तसेच विविध स्तरातील प्रतिनिधी व रक्तदान करणारे बांधव उपस्थित होते.

वैभव फरतडे ✍ (मुंबई प्रतिनीधी)

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक तसेच या शिबिराच्या अनुषंगाने सकल मराठा वैद्यकीय मदत समितीच्या आवाहनास साथ देतं रक्तदान व प्लाझ्मादान करणाऱ्या दात्यांचेही आयोजकांनी मनापासून आभार मानण्यात आले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बहुसंख्य मराठा बांधव व रक्तदान करणारे उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts