loader
Breaking News
Breaking News
Foto

"व्यक्तिविशेष "तुरुंग, पदयात्रा ते मुख्यमंत्रिपद!

राज्यातील सर्व कोरोना रुग्णांना खासगी व सरकारी रुग्णालयात मोफत इलाज करण्याची घोषणा केल्यानंतर आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी देशभरात चर्चेचा विषय ठरले तसेच सोशेल मिडियावर देखील चांगलेच प्रसिद्ध झाले ,जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशात प्रचंड लोकप्रिय आहेत या आगोदर देखील त्यांच्या दानशुरपणाचे अनेक किस्से समाजमाध्यावंर व्हायरल झाले आहेत ते गर्भश्रीमंत असले तरी संघर्षशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तुरुंग, पदयात्रा ते मुख्यमंत्रिपद असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. जाणुण घेवुया त्यांच्या कारकिर्दचा थोडक्यात आढावा.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी १६ महिने तुरुंगवास, १४ महिन्यांत ३६४८ किमी अंतराची पदयात्रा आणि आता मुख्यमंत्रिपद.. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा असा राजकीय प्रवास झाला आहे. वडिलांप्रमाणेच पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधत चंद्राबाबू नायडू यांचा त्यांनी दारुण पराभव केला. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५० जागा जिंकून जगनमोहन रेड्डी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे जगनमोहन हे पुत्र. २००९ मध्ये आंध्रमध्ये राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला पुन्हा संधी मिळवून दिली होती. दुर्दैवाने हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदावर दावा केला. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हे पटले नाही. जगनमोहन यांना कोणतेही पद देण्यास काँग्रेसने टाळले. जगनमोहन यांची आई सोनियांच्या भेटीसाठी गेली असता त्यांना भेट नाकारण्यात आली. ‘सोनिया आपल्या पुत्राला पंतप्रधानपद मिळावे म्हणून प्रयत्न करतात, मग मी माझ्या मुलाला मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून प्रयत्न केल्यास काय बिघडले,’ असा सवाल जगनच्या आईने केला होता. त्यांचे हे विधान तेव्हा चांगलेच गाजले होते. काँग्रेस नेतृत्वाकडून खच्चीकरण करण्यात आल्याने जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. २००४ आणि २००९ मध्ये केंद्रात काँग्रेसला सत्ता मिळण्यात आंध्रचे तत्कातील मुख्यमंत्री व जगनमोहन यांचे वडील राजशेखर रेड्डी यांनी आंध्रमधून मिळवून दिलेले खासदारांचे संख्याबळ कारणीभूत ठरले होते. पण काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या जगनमोहन यांच्या विरोधात काँग्रेसने मग साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला.  पुढे त्यांना बेहिशोबी मालमत्ते प्रकरणात अटक करण्यात आली. पुढे १६ महिने जगनमोहन यांना तुरंगात राहावे लागले. तुरुंगातून जामिनावर सुटल्यावर काँग्रेसला धडा शिकविण्याचा चंगच त्यांनी बांधला होता.

वैभव फरतडे ✍ (मुंबई प्रतिनीधी)

जेल मधुन सुटल्यावर जगनमोहन यांनी पक्ष बांधणीवर भर दिला व२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांनी चांगली लढत दिली. पण भाजपशी हातमिळवणी केलेल्या चंद्राबाबू नायडू यांना सत्ता मिळाली. मात्र न खचता जगनमोहन सतत लोकांचे प्रश्न हातात घेऊन लढत राहिले. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा म्हणून सतत हा मुद्दा चर्चेत ठेवला. विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘प्रजा संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला.वडिलांप्रमाणेच राज्यभर पदयात्रा काढली व आंध्र प्रदेश चा गढ आपल्या ताब्यात घेतला ,आंध्र प्रदेशातील बहुतांश नगर पालिका ,जिल्हा परिषद व स्थानीय स्वराज्य संस्थेत जगनमोहन यांचे वर्चस्व आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

२१डिसेंबर १९७२ मध्ये जगनमोहन यांचा जन्म झाला आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts