loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रेरणादायी! पाच वर्षा च्या चिमुकलीची कोरोनावर मात घरगुती उपचाराने कोरोनाला हरवले!

निमगाव (ह) येथील कु. ईश्वरी गणेश नीळ या पाच वर्षांच्या लहान चिमुरडीनी कोरोनावर मात केली असुन घरगुती उपाय करूनच कोरोनाचा पराभव केला आहे. करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील निमगाव (ह)येथील रेशन दुकानदार गणेश मधुकर नीळ यांची कन्या ईश्वरी या पाच वर्षांच्या लहान चिमुरडीला सुरवातीला थोडा ताप, सर्दी खोकला येणे सुरू झाला. त्यामुळे तिची आरोग्य तपासणी केली असता तिचा रिपोर्ट कोरोना बाधित आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

त्यामुळे तीला आरोग्य सेविका सौ. निकुंभे मॅडम व आशा वर्कर निर्मला इंगळे यांनी गोळ्या औषधे देऊन तिच्यावर उपचार सुरू केले होते. याशिवाय तीने नियमित घरगुती उपाय करूनच, गरम पाणी, हळद कडा,व हभप बापू महाराज नीळ यांनी दिलेली झेंडू बोंडाची बुकटी तयार करून त्याच्या धुराची वाफ घेतली .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

नियमित वाफ व व्यायाम करत या भयानक परिस्थिती मध्ये कोरोना रोगांवर मात करून ती आत्ता एकदम ठणठणीत झाली आहे. कोरोना लागण झाली आहे अशा सर्वच रुग्णांनी न घाबरता न डगमगता घरगुती व आरोग्य विभाग यांच्या सूचनेनुसार उपचार घेतल्यास नक्कीच या रोगांवर मात करु शकतो हे या पाच वर्षांच्या लहान मुलीने दाखवून दिले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गणेश मधुकर नीळ यांनी आरोग्य सेविका, आशा वर्कर व बापू महाराज नीळ यांचे विशेष आभार मानले आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts