loader
Breaking News
Breaking News
Foto

निस्वार्थ पणे जनतेची सेवा करा ,जनता तुम्हाला विसरणार नाही - आमदार निलेश लंके

निस्वार्थ पणे जनतेची सेवा करा जनता तुम्हाला विसरणार नाही ,असे उद्गार पारनेर चे राष्ट्रवादीचे युवा आमदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्याना केले आहे ,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे यांनी स्वखर्चाने पोथरे येथील आनंदी लाॅन्स या ठिकाणी सुरु केलेल्या शंभर बेडच्या कोविड सेंटर उद्घाटन प्रसंगी आमदार लंके बोलत होते. संतोष वारे यांनी या कोविड सेंटर मध्ये शंभर बेडची व व्यवस्था केली असुन काही बेड साठी ऑक्सिजन देखील उपलब्ध आहे तसेच रुग्णांना चहा ,नाष्टा जेवण मोफत दिले जाणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधीक बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की माझ्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला परंतु जनतेची साथ सोडली नाही ,प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होतो तोच खरा नेता व कार्यकर्त्यां असतो ,आज संतोष वारे यांच्या सारखा सामान्य कार्यकर्त्यां शंभर बेड चे कोविड सेंटर उभारतो ,रुग्णांची सेवा करतो ही साधी गोष्ट नाही ,जे काम आमदार ,खासदार यांनी केले पाहिजे ते काम संतोष वारे करत आहेत त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे. भविष्यात पक्षाच्या वतीने व माझ्या वतीने सुद्धा मी या संतोष वारे यांना लागेल ते सहकार्य करण्यास तयार आहे असे सांगितले . आमदार निलेश लंके यांचे आगमन झाल्यानंतर संतोष वारे यांनी आमदार निलेश लंके यांना पाठावर उभे करून पाण्याने पाय धुवुन हळद कुंकू लावून पुजन केले या स्वागता ने आमदार निलेश लंके भारावून गेले मी देव नाही माझे असे स्वागत करु नका असे म्हणताच साहेब तुम्ही आज कठीण काळात जनसेवा करत आहात तुम्ही आम्हाला देवासमान आहात असे कार्यकर्त्यांनी सांगीतले. यावेळी नायब तहसीलदार मोरे तालुका अध्यक्ष संतोष वारे आनंदी लाॅन्स चे मालक बाळासाहेब होसिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अमोल दादा झाकणे आनंद कुमार ढेरे ,शहर अध्यक्ष अभिषेक आव्हाड , राष्ट्रवादी किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन नलावडे, पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्य करणी सदस्य महेश काळे पाटील सरपंच धनंजय झिंजाडे , माजी सरपंच हरींचंद्र झिंजाडे उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

"संतोष वारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष पदाची धुरा घेतल्या पासुन दुष्काळी गावांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरु करुन पाणी पोहचवण्याचे काम केले आहे ,कोरोना काळात अन्नधान्याचे किट तयार करून अनेक गोरगरीब लोकांपर्यंत पोहचवले आहेत, तसेच मास्क सॅनीटायझर चे वाटप करण्यापासून रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे ,रेमडिसिव्हर साठी प्रयत्न करणे या साठी सदैव प्रयत्नशिल असतात ,त्याच बरोबर सर्व शासकीय कार्यालयात, पोलीस स्टेशन ला येणाऱ्या सामान्य नागरिकांना सहकार्य करण्यास ते नेहमी तत्पर असतात त्या मुळे रात्री आपरात्री मदतीस धावणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण होत आहे."

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts