loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महेश चिवटे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केल्या मह्त्वपूर्ण मागण्या , मंत्री शिंदे यांचा सकारात्मक प्रतिसाद.

करमाळा तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवेदन देवुन मह्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत . निवेदनात चिवटे यांनी म्हटले आहे की करमाळा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा प्लांट मंजूर करावा व तात्काळ त्याची शासनामार्फत उभारणी करावी .आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते बार्शी येथे शिंदे व नार्वेकर यांची चिवटे यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा शहरात व तालुक्यात 70 ऑक्सिजन बेड असून करमाळा च्या आजूबाजूला कुर्डूवाडी टेंभूर्णी माढा अशा ठिकाणी मिळून जवळपास दीडशे ऑक्सीजन बेड आहेत प्रत्यक्षात मात्र सध्या या भागात चारशे ते पाचशे पेशंट ऑक्सिजनवर आहेत येणाऱ्या काळात सुद्धा येणाऱ्या तिसर्‍या लाटेत ऑक्सिजनची मोठी कमतरता भासणार आहे करमाळा शासकीय उपविभागीय रुग्णालयात भरपूर मोकळी जागा असून सर्व सोयींनी युक्त हे हॉस्पिटल आहे याठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभा केला तर भावी काळातील ऑक्सिजनची समस्या कायमस्वरूपी संपणार आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी प्रत्येक तालुक्यात ऑक्सीजन प्लांट उभा करण्याची घोषणा केली आहे त्यानुसार प्राधान्याने करमाळा तालुक्यातील ऑक्सीजन प्लांट उभारण्यास तात्काळ मंजुरी देऊन हा प्लांट उभा करावा अशी मागणी चिवटे यांनी केली आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

करमाळा येथील व्हेंटिलेटर बेड नाही किमान दहा व्हेंटिलेटर बेड शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावेत त्याच प्रमाणे पाच ऑक्सिजन कन्स्ट्रक्टर मशीन्स उपलब्ध करून द्याव्यात करमाळा तालुक्यात रेडमी सर इंजेक्शन इतर तालुक्याच्या मानाने अत्यंत कमी प्रमाणात दिले जात आहेत तोही पुरवठा वाढवावा अशा मागण्यांचे निवेदन देऊन सविस्तर समक्ष चर्चा केली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित निवेदन घेऊन तात्काळ कारवाई करतो असे आश्वासन दिले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts