loader
Breaking News
Breaking News
Foto

धाराशिव व सोलापूर जिल्ह्यतील जनतेच्या सेवेसाठी सुसज्ज कोरोना केअर सेंटर व्हावे म्हणून मी करत असलेल्या प्रयत्नांना आज यश आले याचा आनंद आ .तानाजीराव सावंत

धाराशिव व सोलापूर जिल्ह्यतील जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी सुसज्ज कोरोना केअर सेंटर व्हावे म्हणून मी करत असलेल्या प्रयत्नांना आज यश आले याचा आनंद असुन शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली दोन्ही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांनी स्पष्ट केले . भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बार्शी येथे १००० बेडची व्यवस्था असणारे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व शिवसेना सचिव मा.श्री.मिलिंदजी नार्वेकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले त्या वेळी सावंत बोलत होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे खासदार श्री.ओमराजे निंबाळकर, आमदार श्री.ज्ञानराज चौगुले, आमदार श्री.राजेंद्र राऊत, मा.आमदार श्री.ज्ञानेश्वर पाटील, प्रा.शिवाजीराव सावंत मा.आमदार श्री.दिलीप सोपल, श्री.राजेंद्र मिरगणे, श्री.भाऊसाहेब आंधळकर, जि.प.उपाध्यक्ष श्री.धनंजय सावंत, श्री.प्रशांत चेडे, श्री.संजय नाना गाढवे, श्री.दत्ता आण्णा साळुंखे, श्री.अनिल सावंत, श्री.असिफ तांबोळी, श्री.सुरज साळुंके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारद्वारे प्रशासकीय पातळीवर आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू असून जनतेने सुद्धा शासनाचे नियम पाळून स्वतःला व कुटुंबियांना कोरोनापासून दूर ठेवावे, तसेच वेळोवेळी आपली तपासणी करून गरज असल्यास योग्य ते उपचार घ्यावेत अशी विनंती मी यानिमित्ताने आमदार तानाजीराव सावंत यांनी नागरीकांना केली

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बोलताना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकर यांनी सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले असुन शिवसेनेच्या वतिने या कोविड सेंटर ला सर्वतोपरी सहकार्य करु असा शब्द दिला

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts