सोलापूर जिल्ह्यातील हक्काचे पाच टि एम सी पाणी इंदापूर तालुक्यातील बावीस गावांना देण्याची योजना नुकतीच मंजुर झाली आहे . इंदापूर चे आमदार व सोलापूर चे पालकत्व स्विकारलेले पालक मंत्री दत्तामामा भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ,बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यातून ही योजना मंजुर केली असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे सांडपाणी उचलण्याचे गोंडस नाव देवुन उजनीतील जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळवण्याचा हा डाव उधळून लावण्यासाठी सध्या सोलापूर जिल्ह्यातुन प्रंचड विरोध सुरु आहे
पालकमंत्री भरणे यांनी हि योजना मंजूर केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी ,उजनी बचाव समीती च्या वतीने तिव्र विरोध सुरु केला आहे . करमाळा माढा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी खंबीर भुमीका न घेतल्याने त्यांच्यावर देखील विरोधक टिका करत होते
अजित पवार व संजयमामा शिंदे यांचे असलेले सख्य पाहता त्या प्रकलपाला विरोध करतील का आसा सवाल उपस्थित केला जात होता मात्र हक्काचे पाणी जाणार असेल तर या योजनेला विरोध करण्याची भुमिकि आ शिंदे यांनी मांडली होती याच अनुशंगाने आ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अभ्यास पुर्ण निवेदन सादर केले असून नविन पर्याय सुचवला आहे , आमदार संजयमामा शिंदे सुचवलेला हा पर्याय उद्धव ठाकरे व अजित पवार मान्य करतील का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे आ शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की उजनी जलाशयातील ऊर्ध्व बाजुस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून शेटफळगडे ता इंदापूर येथील नवीन मुठा कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण कारावे असे नमूद केले आहे या बाबत निवेदनात अधीक लिहताना आ शिंदे म्हणाले आहेत की उजनी प्रकल्पाचे जलनियोजन या पुर्वीच झाले आहे,आजमितीस या प्रकल्पात कोणतेही अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही त्या मुळे इंदापूर ला पाणी देण्याची तत्वता मंजुर केलेली योजना पुणे शहराच्या सांडपाण्याच्या पुनर्वापरातुन मान्य केल्याचे दिसत आहे सध्या उजनीच्या पाण्याचा पुर्ण वापर झाला असुन मराठवाडय़ासाडी ७.५ टि . एम सी पाणी मंजुर केलेले आहे याच प्रकतपातुन आणखी पाच टि एम सी पाणी मंजुर केल्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होणार असून या योजनेस जनतेचा तिव्र विरोध होईल
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.