loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चाने तयार केलेल्या एकहजार बेड च्या कोविड सेंटरचे उद्या उद्घाटन ,ना एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती

शिवसेना उपनेते माजी जलसंधारण मंत्री सोलापूर धाराशीव चे संपर्क प्रमुख आमदार तानाजीराव सावंत यांनी कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी कंबर कसली असून परांडा येथे स्वखर्चाने ५१ बेड चे कोविड सेंटर उभा केले आहे तर ५ ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, CEO उस्मानाबाद यांच्याकडे सुपूर्त केले आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्य़ात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्ययावत कोविड सेंटर ची गरज निर्माण झाली होती या अनुषंगानेच माजी मंत्री तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेऊन एकहजार बेड चे अद्ययावत कोविड सेंटर उभा केले असुन उद्या या कोविड सेंटर च्या उद्घाटनासाठी नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे ,शिवसेना सचिव तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर उपस्थित रहाणार आहेत या कोविड सेंटर चे उद्घाटन उद्या ७मे रोजी रोजी दुपारी १२ वाजता भगवंत इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी बार्शी ताड सौंदणे रोड बायपास बार्शी येथे होणार आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या कोविड सेंटर मध्ये तज्ञ डॉक्टरांची टिम उपलब्ध रहाणार असुन संपूर्ण औषध उपचार मोफत असणार आहेत,तसेच मोफत एक्सरे,कोविड च्या वेगवेगळ्या आठ रक्त चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत, उत्तम दर्जाचा नाष्टा, दोन वेळेस चहा व जेवणाची सोय,पिण्यास शुद्ध पाणी,प्रशिक्षित योगा टिचर, प्रत्येक तिन रुग्णास शक्य आहे तो पर्यंत स्पेशल रुम अशा सुविधा असणार आहेत ,या अद्ययावत कोविड सेंटर मुळे परिसरातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असल्याने माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या कामाचे जनतेतुन स्वागत व कौतुक होत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकार्याचा वसा अंगीकारून व शिवसेना पक्ष तथा मुख्यंमत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी हे कोविड सेंटर उभा करत असुन भविष्यात आणखीन मोठ्या प्रमाणात शक्य होईल तेवढे काम करणार असल्याचे डाॅ तानाजीराव सावंत यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना सांगीतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts