loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य सरकारने जोमाने आपली बाजू मांडली,आपली लोकं जगली पाहिजेत. यामुळे उद्रेक हा शब्दही काढू नका! कोरोनामुळे संयम ठेवा, बहुजन समाजामध्ये मराठा समाजाला आणावे, यासाठी मी 2007 पासून लढतोय. -खा संभाजीराजे भोसले

राज्य सरकार ने पुर्ण ताकतीने न्यायालयात बाजु मांडली आहे ,हि वेळ राजकारण करण्याचे नाही, आपली माणसं जगली पाहिजेत, कोरोना मुळे उद्रेक हा शब्द सुद्धा घेवु नका आसे आवाहन खासंभाजीराजे,यांनी मराठा समाजाला केले असुन, तसेच मराठा समाजाला बहुजन समाजात आणण्यासाठी मी 2007 पासुन लढतोय असे मह्त्वपूर्ण विधान केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

इंद्रा सहाणीच्या प्रकरणावर जाण्याची गरज नाही. या आधी ज्यांना आरक्षणातून प्रवेश मिळाला त्यांना तसेच ठेवून पुढील आरक्षणाला रद्द केले. कोणी उद्रेक करू नये. कोरोनाची महामारी सुरु आहे. आपली लोकं जगली पाहिजेत. यामुळे उद्रेक हा शब्दही काढू नका! कोरोनामुळे संयम ठेवा, असे आवाहन संभाजीराजेंनी मराठा समाजाला केले आहे.  राज्य सरकारने जोमाने आपली बाजू मांडली. जेवढे शक्य होईल तेवढे केंद्र सरकारला यामध्ये जोडले. केंद्रानेसुद्धा प्रयत्न केले. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तो निकाल आहे त्याच्या पलीकडे आपण काही बोलू शकत नाही, असे मराठा आरक्षणाच्या निर्णयावर संभाजी राजेंनी आपले मत मांडले.

शंभुराजे फरतडे ✍

मी राजकारणाच्या पलीकडे या गोष्टी पाहिल्या आहेत. आधीचे सरकार चुकले ते दुरुस्त केले. आताचे सरकार चुकले तिथेही दुरुस्ती केली. सर्व सरकारांनी मराठा समाजासाठी प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राला वेगळी वागणूक दिली. अन्य राज्यांच्या प्रश्नावर त्या त्या लोकांना बोलवून घेतले, त्यांना न्याय दिला. हा मला पडलेला प्रश्न असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. बहुजन समाजामध्ये मराठा समाजाला आणावे, यासाठी मी 2007 पासून लढतोय. सध्याची परिस्थिती कोरोनाकडे लक्ष देण्याची आहे. आपलं काम प्रयत्न करणे एवढेच आहे. आम्ही आमचा आवाज केंद्र आणि राज्याकडे पोहोचवला, इतर राज्यांमध्ये 50 टक्क्यांवर आरक्षण दिले जाते, यावर आता अभ्यास होणे गरजेचे आहे. दोन्ही सरकारे, विरोधी पक्षांनी एकत्र बसून यावर चर्चा करावी असेही संभाजीराजे म्हणाले. 

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

महाराष्ट्र सरकारने ताबडतोब सुपरन्युमरीद्वारे वाढीव सुविधा द्याव्यात, वैद्यकीय सीटसाठी केंद्र सरकारच्या संस्थेशी बोलावे, त्यांची परवानगी घ्यावी, आर्थिक बाबींवर विचार करायला हवा असे आवाहन संभाजी राजेंनी केले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts