loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून साकार झालेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कौतुक!

कंदर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून साकार झालेल्या कोविड सेंटर चे उद्घाटन तहसीलदार समिर माने ,गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.सागर गायकवाड, सरपंच भास्करराव भांगे उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे, माजी संचालक नवनाथ शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक रंगनाथ शिंदे, ग्रामविकास अधिकारी सलीम तांबोळी, पत्रकार गणेश जगताप, पत्रकार सुहास साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मित्र, सर्व देणगीदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी सर्वच अधिकारी यांनी कंदरकर यांनी चांगला निर्णय घेऊन कोविड सेंटर सुरू केल्याचे कौतुक केले. यासाठी जे काही मदत लागेल तीही आम्ही देऊ असेही अधिकारी म्हणाले.

✍ चौफेर प्रतिनीधी (कंदर)

कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून कोरोना रुग्णांना गावातच प्राथमिक उपचार व सोयी सुविधा मिळाव्यात या साठी सामाजिक जबाबदारीतुन हा निर्णय घेतला व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे कोविड सेंटर उभा राहिले असल्याने सरपंच प्रतिनिधी भास्करराव भांगे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी कंदर येथील सर्व मान्यवर उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts