loader
Breaking News
Breaking News
Foto

घारगाव मध्ये सहा दिवसांचा जनता कर्फ्यु ,ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समीतीचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या संसर्गा पासुन वाचण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करत आहे ,मात्र शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागातच करोनाचा कहर वाढत असल्याने गावोगावी चिंतेचे वातावरण आहे अनेक गावात दररोज कोरोना बाधीतांचे आकडे वाढत असताना मृत्युचे प्रमाण देखील वाढले असुन तरुणांना देखील जिव गमवावा लागला आहे त्या मुळे धास्ती वाढली आहे ग्रामीण भागात सामाजिक अंतर,मास्क,सॅनीटायझर या त्रिसुत्रीचा विसर पडल्याने कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोना पासुन वाचण्यासाठी आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समीती सक्रिय झाली असुन गावात देखील कडक लाॅकडाऊन लावण्यास सुरवात केली आहे ,कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करमाळा तालुक्यातील घारगाव या गावाने दि06/05/2021 सकाळी 6.00 वाजेपासून ते11/05/2021 रात्री 12.00 पर्यंत संपूर्ण गाव बंद असा जनता कर्फ्यु लावलेला आहे. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने गावातील सर्व सुजाण ग्रामस्थांना विनंती करण्यात आली आहे की घारगाव ग्रामपंचायत च्या वतीने सर्व गावाच्या हितासाठी सहा दिवसाचा जनता कर्फ्यु(संपूर्ण गाव बंद) लावण्यात आला आहे. या साठी ग्रामपंचायत कडुन आवाहन करण्यात आले आहे कीआपल्या गावात कोरोना आजारामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे, संपूर्ण गावाला खूप मोठे दुःख झाले आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी मिळून आपल्या गावाला वाचवण्याची वेळ आली आहे. सहा दिवसासाठी खलील नियम सर्व गावकऱ्यांना बंदनकारक राहतील

शंभुराजे फरतडे ✍

1)दूध संस्था सकाळी सात ते साडे आठ व संध्याकाळी सात ते साडे आठ वाजेपर्यंत चालू राहतील. 2)सदर कालावधीत किराणा दुकाने, चिकन,मटण स्टॉल बंध राहतील 3) वैद्यकीय सेवा साठी फक्त गरजू नागरिकांना सवलत असेल 4)कोणी कोणाच्या घरी जाऊ नये, महत्त्वाचे काम असेलतर फोन वर बोलणे. 5) आवश्यक तो किराणा वा इतर गरजेच्या वस्तू नागरिकांनी कोरोनाचे नियम पळून दिनांक 05/05/2021 रोजी सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत प्रत्येक्ष दुकानांतून उपलब्ध करून ठेवण्याचे आहेत. सकाळी 11.00 वाजले पासून फक्त होम डिलवरी च्या माध्यमातून दुकानदारांनी वास्तू पुरवठा करणेचा आहे 5)गावात येताना तोंडाला मास्क बंधनकारक आहे. 6) सदरचे नियमांचे पालन योग्य रीतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणेने मार्फत कार्यवाही कार्यवाही करणार आहे। 7) जे ,दुकानदार ,आस्थापना धारक नियमाचे उल्लंघन करून वस्तू पुरवठा करतील त्याचवर रुपये 5000/ची दंडात्मक कार्यवाही करून दुकान विहित कालावधी साठी सील करण्यात येईल

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

वरील सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून कोरोना साखळी तोडण्यास महत्त्वाचे योगदान द्यावे,असे आवाहन सरपंच यांनी समस्थ ग्रामस्थांना केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts