loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या उजनी पाण्याच्या भुमिकेवर नेटकऱ्यांकडुन सवाल उपस्थित, दिशाभूल करणारे वक्तव्य असल्याचे युवकांचे मत

उजनी धरणाची उंची दोन मीटरने वाढवा, मगच पाच टीएमसी पाणी इंदापूरला न्या, असे सांगून उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सांडपाणी हा खोटा शब्दप्रयोग वापरुन इंदापूरला नेण्याचा आदेश सरकारने काढलेला आहे. पण हे सर्व सांडपाणी दौंडपर्यतचे शेतकरी उचलतात. त्यामुळे ही निव्वळ दिशाभूल आहे. सोलापूर जिल्ह्यावर हा मोठा अन्याय झालेला आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध राहील यासाठी आंदोलन ही करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार राजन पाटील यांनी काल एका व्हिडीओ द्वारा दिला होता तसेच या प्रश्नावर लोकनेते साखर कारखान्यावर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला होता मात्र राज पाटील यांनी घेतलेल्या भुमिकेवर मोहोळ,करमाळा येथील युवकांनी सवाल उपस्थित केले असुन राजन पाटील यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे असे म्हटले आहे. आपल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले होते की १९९३ साली मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार धरणाची उंची दोन मीटरने वाढविल्यास पाठीमागील जमिनीला कसलाही धोका न होता आणि कोणत्याही शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित न करता १२ टीएमसी पाणी धरणात साठेल. यातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल व राहिलेले ७ टीएमसी पाणी सोलापूर जिल्हााला मिळेल. या योजनेसाठी सरकारला जास्त खर्चही करावा लागणार नाही. उजनीच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांनी मोठा त्याग केला आहे. उजनीच्या पाण्यासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. याचा विसर राज्य सरकारला पडलेला आहे. असा घरचा आहेर त्यांनी सरकारला दिला होता

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पाटील यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त करताना पत्रकार सुहास घोडके यांनी फेसबुक वर सवाल उपस्थित करत म्हटले आहे की काल माजी आमदार राजन पाटील यांची मुलाखत ऐकली आणि आज वाचली. ते बोलताना म्हणाले की, उजनी जलाशयातील ५ TMC पाणी नेण्यास आमचा विरोध आहे. कारण हे पाणी नेले तर आमच्यावर खुप मोठा अन्याय होईल त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्ही जिल्हावासीय अथवा तालुकावासीय असल्याचा अभिमान वाटला. पण त्यांनी धरणातील पाणी चोरांचे नाव घेण्यास मात्र जाणीवपूर्वक टाळाटाळ केली हे आवर्जुन लक्षात आलं. पुढे बोलताना ते म्हणाले की १९९३ रोजी मंत्रीमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ फुटाने वाढवली तर धरणात १२ TMC पाण्याची वाढ होईल. त्यामुळे ५ पाणी नेले तर हरकत नाही. म्हणजे १२ Tmc पाण्याची वाढ झाली तर ५ TmC इंदापूरला अर्थात राहिलेले ७ Tmc पाणी कर्जत जामखेडला जावु शकते. त्यामुळे मुळात मुद्दा असा आहे की, उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे आणि त्याचा वापर सोलापूर जिल्ह्यासाठीच व्हावा. धरणाची भिंत २ फुटाने वाढवली तरी ती सोलापूरकरांच्या हितासाठीच वाढवावी. त्यासाठी इंदापूरकर अथवा बारामतीकरांचा उजनीवर काही एक अधिकार नाही. #इंदापूरला पाणी नेण्यासाठी सक्त विरोधच राहिल.

समाधान वाघमारे या फेसबुक युझरने म्हटले आहे की राजन पाटलांचा व्हीडीओ ऐकला का व्यवस्थित , त्यांनी शेवटी सांगितलेला पर्याय फार वाईट आहे,उजनीत इतर ठिकाणं वरून पाणी अन्यण्याबद्दल ते बोलत नाहीत, पण उजनीची गेट ची उंची 1 मीटर ने वाढवली पाहिजे असं म्हणत आहेत त्यामुळे 12 टीएमसी पाणी वाढेल त्यातून 5 टीएमसी इंदापूर ला द्या, व बॅकवॉटर वाल्यांनी चुकीचा विरोध केला म्हणत आहेत, आधीच जमिनी अधिग्रहण झाले आहेत त्यातच हे पाणी मावणार आहे असं ते चुकीचं सांगत आहेत, याविषयी मागे एकदा प्रस्ताव आला होता 1993 ला त्यावेळी बॅकवॉटर वाल्यांनी विरोध केला होता म्हणून ते काम थांबलं होत, आताही राजन पाटील चुकीचं सांगत आहेत, 117 टीएमसी असणार धरण 110 टक्के पाणी अडवलं जात व 123 टीएमसी पाणी अडवलं जातं, अजून जर 12 टीएमसी पाणी अडवलं व गेटची उंची 1 मीटरने वाढवली तर 135 टीएमसी पाणी उजनीत बसू शकत नाही ,नव्याने जमिनी अधिग्रहण कराव्या लागतील, करमाळा तालुक्यातील कंदर- करमाळा रोड वांगी 1 ते वांगी 3 ढोकरी बिटरगाव येथील परिसर,रस्ते आणि पुन्हा काही गावे पाण्याखाली जातिल बऱ्याच ठिकाणी अस होणार आहे त्यामुळे बॅकवॉटर चा गेटची उंची वाढवायला विरोध आहे मोठ्या कष्टाने उजनीकडच क्षेत्र शेतकऱ्यांनी विकसित केले आहे ते परत पाण्याखाली जाणार आहे ,अधिग्रहित क्षेत्र शिल्लक नाही. जिल्ह्यातील नेत्यांना कृष्णा नदीतून, निरेतून पाणी आणायला नको,पाणी बाहेरून आणायला नको व आहे त्यावर अजून बोजा टाकायचा हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. जिल्ह्यातील नेत्यामध्ये पवारांना विरोध करण्याची हिम्मत नाही म्हणून असले काहीतरी नवीन मुद्दे उचलून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.याला उजनी बॅकवॉटर व धरणग्रस्थानी याल विरोध करावा व असे मला वाटते.

शंभुराजे फरतडे ✍

तर मोहोळ येथील शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करुन म्हटले आहे की उजनी जलाशयातील पाणीहक्कांबाबत मोहोळ तालुक्याचे माजी आमदार मा. राजन पाटील साहेब यांनी घेतलेल्या भूमिकेत अजिबात स्पष्टता आणि ठामपणा नाही. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्यास विरोध तर केला पण धरणातील पाणीचोरांचे नाव घेणे जाणीवपूर्वक टाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार १९९३ रोजी मंत्रीमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटरने वाढवली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यावेळी ५ टीएमसी पाणी इंदापूरला गेले तरी हरकत नाही. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाल्यावर ५ टीएमसी इंदापूरला, अर्थात राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जावु शकते यात कुठलीही शंका नाही . जरी महाराष्ट्र राज्य सरकारने उजनी धरणाची उंची २ मीटरने वाढवली तरी ते सर्व वाढणारे १२ टीएमसी पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे आहे. कारण सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त असताना सोलापूरला बारमाही पाणी मिळावे यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून या धरणाची निर्मिती झाली होती. पण सध्या उजनीच्या पाणीवाटप नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या सोलापूर जिल्ह्यास मिळत आहेत. जर भविष्यात धरणाची उंची दोन मीटर ने वाढवली तर किमान सोलापूर जिल्ह्याला ८ महिने तरी पाणी मिळेल. उंची वाढवल्यानंतर येणारे अतिरिक्त पाणी हे इथल्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्काचे असेल. ते पुणे जिल्ह्याला किंवा बारामतीला तुमच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा माझा तुम्हाला रोखठोक सवाल आहे. मागच्या दहा वर्षात 4 ते 5 वेळा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडला त्यावेळी शासन नियमानुसार उंचावरच्या म्हणजेच पुण्यातल्या धरणातून खाली सोलापूरसाठी पाणी सोडणे आवश्यक होते परंतु त्यावेळी पाणी सोडले गेले नाही. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची तहान भागवण्यासाठीच आहे. त्यामुळे सध्या आणि भविष्यात उंची वाढवल्यावर देखील त्याचा सोलापूरच्या जनतेच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठीच त्याचा वापर झाला पाहिजे. इथल्या शेतकरी कष्टकरी जनतेच्या हक्काचं पाणी आम्ही इतर कोणाला देऊ देणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करु असे म्हटले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हर्षवर्धन पाटील या फेसबुक युझरने कंमेट करताना म्हटले आहे की धरणाची उंची वाढवली तर सोलापूर जिल्ह्य़ातील प्रामुख्याने करमाळा तालुक्यातील गावे उठतील आणि त्यांच पुनर्वसन करायला बाकी तालुक्यातील जमिनी हस्तांतरित केल्या जातील एकूण काय तर जमिनी,गावे सोलापूर जिल्ह्य़ातील जाणार आणि पाण्याचा वाटेकरी इंदापूर होणार. त्यापेक्षा अर्धवट राहिलेली स्थिरीकरण योजना करून कृष्णेच वाया जाणार पाणी उजनीत आणा सर्वांना पाणी मिळेल नुकसान कोणाचही होणार नाही.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts