कोरोना चा फैलाव रोखण्याकरीता करमाळा तालुक्यातील पोथरे येथे 6 मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते 14 मे रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत कडक बंद पाळण्याचा निर्णय आज आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला .
यावेळी पोथरे ग्राम आपत्ती व्यवस्थापन समन्वय समितीच्या वतीने सरपंच धनंजय पाटील, पोलिस पाटील संदिप शिंदे, ग्रामविकास अधिकारी हरीभाऊ दरवडे यांनी नऊ दिवस एकजूटीने कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन प्रसिद्ध पत्रक काढून केले आहे.
सध्या पोथरे सह वाड्या वस्तीवर कोरोना रूग्ण वाढत आहेत.अनेक तरुणांना कोरोना संसर्गजन्य अजाराने जिव गमवावा लागला आहे .त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे ,आणखी धोका नको म्हणून अपत्ती व्यवस्थापन समीतीची तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व कोरोनाला रोखण्यासाठी कडक गाव बंद पाळण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला असुन या काळात केवळ वैद्यकीय सेवा-सुविधांना मुभा असणार आहे. तर गावातील किराणा दुकानेही बंद राहणार असून छुप्या मार्गाने साहित्य देवाणघेवाण झाल्यास पाच हजार रुपये दंडासह तीस दिवसांसाठी परवाना रद्द करण्यात येईल.तसेच विनाकारण मोकाट विना मास्क फिरणार्यास 144 कलम अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.