loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे च्या इशाऱ्या नंतर महापारेषण कडुन ट्रान्स्फर चे काम प्रगतीपथावर उद्या पासून विजपुरवठा सुरळीत होणार

132 EHV मेन लाईन चे काम दोन दिवसात पुर्ण केले नाही तर पुढे काय होईल हे महावितरण ला चांगले माहिती आहे असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी महावितरण व महापारेषण ला दिला होता याची गंभीर दखल महापारेषण विभागाने घेतली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

महापारेषण कंपनी कडुन महावितरण कंपनी ला वीज पुरवठा केला जातो करमाळा (महापारेषण कंपनी) येथील एक ट्रान्सफार्मर निकामी झाल्यामुळे करमाळा,मांगी ,जातेगाव,पोटेगाव, पांडे ,ह्या पाच सबस्टेशन वर येणार्‍या चाळीस गावांना फक्त एकतास वीज पुरवठा सध्या केला जात आहे , त्यामुळे तेथील पिके धोक्यात आली आहेत. हा ट्रान्सफार्मर तात्काळ बसवावा अन्यथा तिव्र आंदोलन करु असा इशारा घोलप यांनी दिला होता ,मनसे च्या इशाऱ्याची गंभीर दखल महापारेषण विभागने घेतली असुन ट्रान्सफार्मर बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे

शंभुराजे फरतडे ✍

मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज प्रत्यक्ष काम सुरु असलेल्या ठिकाणी जावुन कामाचा आढावा घेतला या वेळी संबंधित ठेकेदार व अधिकारी यशपाल यादव यांनी काम युद्धपातळीवर सुरु असुन उद्या पर्यंत ट्रान्सफार्मर बसवुन विजपुरवठा सुरळीत करुन देवु असा शब्द मनसे शिष्टमंडळास दिला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

उद्या पर्यंत विजपुवरठा सुरळीत नाही झाला तर मनसे स्टाईल दाखवु असा इशाराच घोलप यांनी दिला आहेया वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा चे शहर उपाध्यक्ष मा रोहित फुटाणे, सचिन कणसे,शहर म.न.वि.से चे तेजस राठोड ,विजय हजारे ,अमोल जांभळे, स्वप्निल कवडे, प्रथमेश राठोड आदी उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts