loader
Breaking News
Breaking News
Foto

पंढरपूर पोटनिवडणूकीचा निकाल भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा -गणेश चिवटे

मंगळवेढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला जनतेने दाखविलेला आरसा असुन हा विजय भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी करमाळा चौफेर शी बोलताना व्यक्त केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधिक बोलताना चिवटे म्हणाले की कोरोना काळात शेतकऱ्यांची वीज तोडुण तर जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.याचा देखील शेतकऱ्यांनी मतपेटीतून राग व्यक्त केला असेही चिवटे यांनी म्हटले आहे, तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना तिन्ही पक्ष एकत्र असल्याचा गर्व होता ,तसेच स्व भालके यांच्या सहानभुतीचा फायदा होईल अशी आशा होती पंरतु जनतेने भावने पेक्षा विकासाला साथ देत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे गर्व हरण केले असल्याचा टोला चिवटे यांनी या वेळी लगावला .

शंभुराजे फरतडे ✍

तिन पक्ष एकत्र असल्यास यांच्या विरोधात "एकही मायचा लाल टिकणार नाही" अशी वल्गना काही नेते करत होते मात्र भावनेची लाट व तिन पक्ष एकत्र असताना भाजपाला मिळालेला हा विजय कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा असुन भविष्यात 'शतप्रतिशत भाजप' या विचारानुसार स्वबळावर भाजपाचा मुख्यमंत्री झालेला महाराष्ट्राला पहावयास मिळेल असा विश्वास ही चिवटे यांनी व्यक्त केला

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, तालुका सरचिटणीस काका सरडे,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,आदि उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts