मराठा उद्योजक लाॅबीच्या प्रेरणेतून मुंबईमध्ये प्रथमच घरपोच पॅथॉलॉजी टेस्ट व घरपोच कोरोना स्वॅब टेस्टची अद्ययावत सेवा पुरविणाऱ्या "AR लॅबडोअर" या कंपनीच्या शाखेचा- ऑफिस नं-1, देविकृपा बिल्डिंग नं-5, गौरीशंकरवाडी नं-1, जैनमंदिरा जवळ, घाटकोपर(पूर्व) मुंबई येथे मा.किरणभाऊ लांडगे(नगरसेवक /सुधार समिती सदस्य, बृहन्मुंबई महानगरपालिका) व मा.राखीताई जाधव(गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी /नगरसेविका, बृहन्मुंबई महानगरपालिका) यांच्या शुभहस्ते शुभारंभ झाला. कोविडच्या या भीषण काळात या कोविड स्वॅब कलेक्शन सेंटरची मुंबईतील प्रत्येक शहरात नितांत गरज होती त्यात या "लॅबडोअर" कंपनीची विशेष सेवा म्हणजे घरपोच कोविड स्वॅब घेण्याची अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेशासनाने ठरवून दिलेल्या माफक दरात आणि सोबतच 24 ते 48 तासात रिपोर्ट मिळण्याची सुविधाही या कंपनीचे वैशिष्ट्य आहे
या ब्रँचच्या शुभारंभप्रसंगी मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भरघोस प्रतिसाद देत या सेवेचे स्वागत तसेच शुभेच्छा दिल्या आहेत या शुभारंभाप्रसंगी मा. किरणभाऊ लांडगे यांनी या कंपनीची संपूर्ण अद्ययावत कार्यप्रणाली समजून घेत त्याद्वारे मुंबईकरांसाठी सुरु झालेल्या या विशेष सेवांचे कौतुक केले तसेच राखीताई जाधव यांनी ही सेवा समस्त मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणेवासियांना या कोरोना काळात नक्कीच लाभदायक ठरेल विशेषतः ईमर्जन्सी काळात अथवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना कोविड स्वॅब देता येणे तसेच टेस्टची सर्व प्रक्रिया घरपोच मिळाल्याने लवकर पुढील निदानासाठी याची मदत होणार आहे असे म्हणत मराठा उद्योजक लॉबीच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या संकल्पनेला तसेच कंपनीच्या घाटकोपर शाखेला व त्यांच्या टीमला दोघांनीही भरभरून सदिच्छा दिल्या आहेत
मुंबई, नवी मुंबई व ठाणेकरांनी ही घरपोच सेवा घेण्यासाठी 7057723316 या नंबरवर कॉल करून आपली टेस्ट बुक करायची आहे त्यानंतर त्वरित या कंपनीचे प्रशिक्षित स्वॅब एक्स्पर्ट आपल्या घरी येऊन आपला स्वॅब घेतात व त्यानंतर आपली टेस्ट प्रक्रिया पूर्ण करून आपला रिपोर्ट 24 ते 48 तासात आपल्या व्हाट्सअप तसेच इमेल आयडीवर पाठविले जातात.अशी माहिती लॅबडोअर टीमने दिली.. तसेच या कंपनीची नाशिक, पुणे, मनमाड, मालेगाव, सिन्नर इथेही सुविधा उपलब्ध असल्याचेही सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.