loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादीचे भैय्याराज गोसावी यांचा भाजपात प्रवेश, भाजपाने दिली मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी ओबीसी सेल युवकचे तालुकाध्यक्ष भैय्याराज गोसावी यांनी राष्ट्रवादीला अखेरचा रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हासरचिटणीस किरण बोकण मोर्चा तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे,यांनी गोसावी यांचे स्वागत केले असून गोसावी यांच्या कडे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस पदाची महत्वाची जबाबदारी सोपवली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी गणेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त करताना ओबीसी मोर्चा च्या माध्यमातून गोसावी यांनी गोरगरीब जनतेचे काम करून पक्ष तळागाळापर्यंत पोहचवावा असे आव्हान केले निवडीनंतर बोलताना गोसावी म्हणाले की गणेश चिवटे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला प्रेरित होऊन मि भाजपात प्रवेश केला असून चिवटे यांच्या माध्यमातून ओबीसी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणार असून समाजाच्या प्रश्नासाठी कार्यरत रहाणार असल्याचे सांगीतले

शंभुराजे फरतडे ✍

यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, अल्पसंख्याक सरचिटणीस वसीम सय्यद ,युवा मोर्चा उपाध्यक्ष हर्षद गाडे ,तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, युवा नेते महावीर कळसे, मनोज मुसळे, मंगेश नलवडे, सागर सरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गोसावी यांच्या निवडीनंतर देवळली, सौंदे,सरपडोह, वरकटणे,या गावातील अनेकांनी भैय्याराज गोसावी यांचे अभिनंदन केले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts