loader
Breaking News
Breaking News
Foto

पक्षसंघटनेच्या गचाळ कामगिरीमुळेच पंढरपुरात राष्ट्रवादीचा पराभ -महेश काळे पाटील

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार स्व भारत नाना भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर झालेल्याला पोटनिवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले असुन भाजपाचे समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे ,भालके यांचा पराभव जिल्हाभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला असून पक्षांतर्गत कुरघोडी समोर येवु लागल्या आहेत .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

राष्ट्रवादी चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व माजी युवक जिल्हाउपाध्यक्ष महेश काळे यांनी देखील प्रसिद्धी पत्रक काढून नाराजी व्यक्त केली आहे

✍ चौफेर प्रतिनीधी

पक्षसंघटनेच्या गचाळ कामगिरीमुळे पंढरपुरात राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचे मत युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य महेश काळे पाटील यांनी चौफेरशी बोलताना व्यक्त केले. पंढरपूरच्या निकालाविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की,नेत्यांची भाऊगर्दी करण्यापेक्षा यापुढे कार्यकर्ता केंद्रित काम उभं करावं लागेल. युवक राष्ट्रवादी,पदवीधर,महिला यासह पक्षाच्या सर्वच सेलच्या पदाधिकाऱ्यांच्यात समन्वय नसल्याने निवडणुकीत विरोधकांचे फावले आहे व ही बाब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही लक्षात आली आहे. भविष्यात कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत संघटना मजबुतीकरण पक्षाला करावे लागनार असल्याचेही ते म्हणाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या निवडीत कर्तुत्वा ऐवजी घराणेशाहीला प्राधान्य दिले गेले ,निष्ठावंत कार्यकर्त्यांना खड्या सारखे बाजुला सारुन शिफारसी वरुन निवडी झाल्याने फटका बसल्याचा गंभीर आरोप देखील महेश काळे पाटील यांनी केला आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts