loader
Breaking News
Breaking News
Foto

क्लिप व्हायरल!अनेक प्रश्न उपस्थित, नेमकं दोषी कोण,काय होणार कारवाई?

करमाळा तालुक्यातील पंचायत समितीतील जाधव आडनाव असलेला आधिकारी व पवार आडनाव असलेल्या डाॅक्टरची रेमडिसिव्हर लसी बाबत झालेल्या व्यवहाराच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली होती ,हा रेमडिसिव्हर चा काळाबाजार असल्याच्या अफवा उडाल्या होत्या मात्र संबंधित जाधव यांनी पत्नीच्या उपचारासाठी रेमडिसिव्हर आणले होते त्यातील शिल्लक राहिलेले पाच रेमडिसिव्हर जाधव यांनी प्रती एक ४८०० प्रमाणे डाॅ पवार यांना दिले पवार यांनी जाधव यांना १७ हजार दिले व शिल्लक राहिलेल्या ०७ हजार रुपयासाठी हा काॅल केला होता यातील संवाद डाॅ पवार यांना देखील मान्य असल्याचे व्हायरल संवादावरुन दिसत आहे संबंधित काॅल आज व्हायरल झाला असला तरी संवादावरुन हे प्रकरण सहा महिन्या पुर्वीचे असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळेच हा रेमडिसिव्हरचा चालु काळातील काळाबाजार नसल्याचे उघड आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तहसीलदार समिर माने यांनी प्रसिद्धी पत्रक काढुन सध्या येणार्‍या रेमडिसिव्हर शासन नियमानुसार वितरीत होत असुन या क्लिप चा व आजच्या पुरवठ्याचा कोणताही संबध नाही मात्र असे असले तरी पंचायत समितीचे गटविकास आधिकारी, व वैद्यकीय अधिकारी संबंधित व्यक्तीची चौकशी करुन त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करतील असे जाहीर केले आहे मात्र कथीत व्हायरल काॅल मुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत

✍ चौफेर प्रतिनीधी

शिल्लक राहिलेले रेमडिसिव्हर मेडिकल ला जमा करण्या ऐवजी क्लिप संबधीत डाॅ पवार यांनी का खरेदी केले? 4800 प्रमाणे खरेदी केलेले रेमडिसिव्हर डाॅ पवार यांनी कोणत्या रुग्णाला व किती रुपयाला विकले ? पंचायत समितीतीतील जाधव हे मि रुग्णालयाच्या बील देखखरेकच्या समितीवर आहे ,उद्या पालक मंत्री येणार आहेत, तुमच्या हास्पिटल च्या बिलाच्या असंख्य तक्रारी आमच्या कडे आहेत असे का सांगत आहे? संबंधित क्लिप मधील संवादा वरुन डाॅ पवार कोण आहेत? जाधव अधिकारी कोण आहेत? हे उघड झाले आहे यातील नेमका दोषी कोण आहे ? दोषींवर कडक कारवाई होणार की "तु कर रडल्या सारखं मि करतो मारल्या सारखं" असं होणार? डाॅ पवार व जाधव यांच्या संभाषणाची क्लिप नेमकी व्हायरल कोणी केली व त्याचा हेतु काय? असे अनेक सवाल आता या निमित्ताने उपस्थित झाले आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या कथीत व्हायरल क्लिप ची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत आशी मागणी जोर धरत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts