loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाळ्या पुर्वीच महावितरणने विज दुरुस्तीची कामे करावीत - शंभुराजे फरतडे

पावसाळा लागण्या आगोदर विज उपकरणांच्या दुरुस्तीची सर्व कामे तात्काळ करुन घ्यावीत तसेच कुठे कुठे दुरुस्तीची गरज आहे त्या ठिकाणी पाहणी करून दुरुस्ती केल्याचे वृत्त महावितरणने प्रसिद्धीस द्यावे आशी मागणी युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे संस्थापक शंभुराजे फरतडे यांनी महावितरण कडे लेखी निवेदना द्वारे केली आहे महावितरण ला दिलेल्या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की ग्रामीण भागात पावसाळ्यास सुरवात झाल्यांनतर मुसळधार पाऊस किंवा वादळ वारे नसताना देखील चार चार दिवस विज गायब होते त्याचे प्रमुख कारण म्हणजे विज खांबावर असलेल्या चिमण्या (डिस्क)खराब होवुन विजपुरवठा खंडित होतो.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

चॉकलेटी रंगाचे डिस्क ईन्सुलेटर (चिमण्या) तसेच डिपी स्ट्रक्चर वर असणाऱ्या पोस्ट ईन्सुलेटर ह्या चिनी मातीच्या असतात विज प्रवाह लोखंडी खांबात उतरु नयेत यासाठी या चिमण्या गरजेच्या असतात परंतु उन्हाळ्यात अती उन्हा मुळे तापतात व पावसाचे चार थेंब जरी पडले तरी फुटून जातात त्या मुळे विजपुरवठा चार चार दिवस खंडित होतो

पुर्व भागातील सिना कोळेगाव धरणावर सध्या अपुऱ्या दाबाने विज पुरवठा सुरु आहे तो आठ तास करावा या साठी वारवंवार मागणी करत आहेत पंरतु फक्त सहा तास पुरवठा होत आहे तोही कमी दाबाने सुरु आहे ,पुर्व भागातील, निमगाव ते फिसरे , निमगाव, ते गौंडरे हि लाईन खुप जुनी असुन या खांबावरील डिस्क जुणे झाले आहेत, पावसाची रिमझिम झाली तरी विजपुवरठा खंडित होवु शकतो ,त्या मुळे तात्काळ डिस्क बदलुण द्याव्यात व पावसाळा पुर्वी दुरुस्ती मोहीम राबवावी (शंभुराजे फरतडे युवासेना समन्वयक)

✍ चौफेर प्रतिनीधी

तसेच पावसाचे दिवस असल्याने विज यंत्रणेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी देखील हि कामं धोकादायक ठरु शकतात. त्या मुळे महावितरणने पावसाळा सरु होण्या आगोदर पहिल्यांदा खराब झालेल्या (चिमण्या) डिस्क, डिपी वरील पोस्ट ईन्सुलेटर, फ्युजा बदलणे हि कामे पुर्ण करावीत आशी मागणी शंभुराजे फरतडे यांनी केली असुन , काही ठिकाणी विजेचे खांब कललेले आहेत,तारांना झोळ पडलेले आहेत ,तसेच विजेच्या खांबाजवळ धोकादायक झाडे वाढली आहेत या कडे देखील फरतडे यांनी लक्ष वेधले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts