करमाळा व जेऊर उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड स्वतंञ कोविड सेंटर उभारावीत आशी महत्वपूर्ण मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे यांच्या कडे केली आहे .या बाबत आरोग्य मंत्री यांना सविस्तर निवेदन दिले असुन त्यात माजी आमदार पाटिल यांनी तालुक्यातील समस्या मांडल्या आहेत
करमाळा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची 100 च्या घरात गेली आहे.असे घडत असतानाही करमाळा तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही, शिवाय रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.त्यामुळे प्रशासनाने करमाळा व जेऊर येथे व्हेन्टिलेटर बेड सह सर्व सुविद्यानीयुक्त असे कोविड सेंटर सुरू करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. याबाबत आरोग्यमंञी राजेश टोपे,तसेच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे
या निवेदनात म्हटले आहे की ,करमाळा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.दररोज सरासरी 70 ते 80 कोरोना रुग्ण सापडत आहेत.कोरोना वरील उपचारासाठी होणारा खर्च गोरगरिबांना परवडणार नाही.कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता करमाळा तालुक्यात करमाळा व जेऊर येथे उपजिल्हा रुग्णालये असुन येथे स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे .या कोविंड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बेड,रेमडीसिव्हर इंजक्शन ,ऑक्सिजन बेड याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा धोकादायक असून वेळीच याला आवर घातला नाही तर भविष्यात तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल, हा आकडा वाढत गेला तर कोरोना रुग्णांवर उपचार करणे अवघड होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक यंत्रणा तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे. करमाळा तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही.कोरोना रूग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली असेल तर त्यांना तालुक्याबाहेर पाठवावे लागत आहे सध्याच्या परिस्थितीत बाहेरदेखील व्हेन्टिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ करमाळा तालुक्यात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करणे गरजेचे आहे .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.