loader
Breaking News
Breaking News
Foto

अगोदर शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची सोय करा मगच लॉकडाऊन चा विचार करा-अमरजीत साळुंके

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी च्या लॉकडाउन मुळे शेतकरी आर्थिक व मानसीक दृष्ट्या संपुर्ण खचला आहे. अजूनही चालू वर्षीच्या गाळप झालेल्या ऊसाची बिले शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत, तरीदेखील शासनाच्या वतीने लाईट बील, घरपट्टी व इतर कर, बँकां व इतर वित्तीय संस्था च्या वतीने विविध प्रकारच्या वसुल्या झाल्या आहेतच.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शासनाने अगोदर कष्टकरी व शेतकरी यांची सोय करावी मगच लॉकडाउन चा विचार करावा अशी मागणी भाजपा चे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी केली आहे.

शंभुराजे फरतडे ✍

शेतीला लागणाऱ्या सर्वप्रकारच्या निविष्ठा, पाईप, मोटार, ड्रीप साहित्यांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेच. शेतमजुरी वाढली आहे, कोरोना मुळे मजूर कामावर येऊ शकत नसल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. ट्रॅक्टर शेत मशागतीचे दर तर गगनाला भिडले आहेत, नेहमीप्रमाणे विजेची अडचण ही ठरलेली आहेच. असे असतानाही शेतमाल कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे, सध्याच्या परिस्थितीत कोणती पिके लावावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

असे असतानाही शेतमाल कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे, सध्याच्या परिस्थितीत कोणती पिके लावावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. अशा परिस्थितीत लॉक डाउन म्हटले की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि उपाय योजना करावेत असेही श्री. साळुंके यांनी म्हटले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts