राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हि निष्ठावंताना न्याय देणारी पार्टी असुन निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होवु देणार नसुन पंढरपूर विधानसभेची पोट निवडणूक संपल्यानंतर करमाळयात एकदिवसीय बैठकीचे आयोजन करुन जुन्या नव्यांचा मेळ घातला जाईल आसा विश्वास राष्ट्रवादी कांग्रेस चे सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक सुरेश आण्णा घुले यानी सा चौफेर शी बोलताना व्यक्त केला.
नुकत्याच करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पदाधीकारी निवडींचा कार्यक्रम पार पडला या निवडीत राष्ट्रवादीच्या अडचणीच्या काळात ज्यांनी पक्षाचा किल्ला लढवला अशा निष्ठावंताना डावलुन युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी वशिलेबाजी करुन पक्षाशी संबंध नसलेल्यांना व पदासाठी मुलाखती न दिलेल्यांना म्हतवाच्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली आहेपवार साहेबांवर निष्ठा ठेवुन पक्षाचे काम करुन सुद्धा अन्याय झाल्याने तरुण निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करत सामुहिक राजीनामे देण्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर सा चौफेर च्या प्रतिनीधीने घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील वक्तव्य केले आहे
राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक पदा वर काम करत असलले सुरेश घुले हे शरद पवार व अजितदादा पवार यांचे विश्वासु म्हणून ओळखले जातात, कडक शिस्तीचा नेता, व प्रमाणीक व्यक्ती व निष्ठावंताची कदर करणारा माणूस म्हणून घुले यांची ओळख आहे,कार्यकर्त्यांच्या कष्टाची व त्यागाची घुले यांना चांगली जाणीव असुन घुले यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तालुक्या सहित जिल्यातील निष्ठावंतांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, दिलेल्या आश्वासनानंतर प्रमाणे बैठक घेऊन घुले निष्ठावंताना न्याय देतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.