loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणारे कार्यक्रम कौतुकास्पद-दिग्विजय बागल

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना युवा सेनेच्या वतीने तिथीनुसार साजरी होत आसलेली शिवजयंती आरोग्य विषयक उपक्रम राबवून आगवेगळ्या पद्धतीने साजरी होत असल्याने गोरगरीब व अंपंग व गरजु लोंकाना आधार देणारी ठरत असल्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व युवा सेनेचे हे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले करमाळा येथील बसस्थानकावर एस टी वाहक व चालकांसाठी तसेच प्रवाशांसाठी ठेवलेल्या नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन बागल यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी ते बोलत होते.अधिक बोलताना दिग्विजय बागल म्हणाले कि शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण व विस टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना वाटचाल करत असुन भविष्यात शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षणा च्या प्रश्नावर भरीव काम करणार असल्याचे सांगितले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा आगाराच्या आगार प्रमुख अश्विनी किरगत उपस्थित होत्या या वेळी बोलताना किरगत म्हणाल्या कि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आरोग्य महायज्ञ आयोजित करुन शिवजयंती साजरी करत आहे हि गोष्ट अभिनंदनीय असुन सर्वांनी या उपक्रमाचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले . या वेळी नेत्ररोग तज्ञ डॉ दिलिप आहिरे, डाॅ प्रियंका आहिरे,डॉ भुषण गवई यांचा दिग्विजय बागल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

✍ चौफेर प्रतिनीधी

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी भविष्यात शिवसेना आरोग्य कक्षा च्या वतिने तालुक्यातील गोरगरीबांना सुविधा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे, माजी शहर प्रमुख संजय शिलवंत ,युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे ,युवा सेना शहर अध्यक्ष विशाल गायकवाड, व सर्व पत्रकार उपस्थित होते कुटिर रुग्णालय येथे 436 व करमाळा बसस्थानकावर 278 असे एकूण 714 गरजुनी नेत्र तापसणी करुण मोफत चेष्म्याचा लाभ घेतला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णसेवेचा प्रसार केला जात असून याचा फायदा समाजातील गरजू घटकांना होत आहे असे मत उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे यांनी व्यक्त केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts