loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर करमाळा आगार सज्ज.केल्या आहेत या उपाययोजना!

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला ,परिवहन महामंडळाला देखील प्रचंड तोटा सहन करावा लागला पंरतु या बिकट परिस्थितीत देखील प्रवाशांच्या सोयी साठी एस टी महामंडळाने अथक प्रयत्न केलेसध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे या पार्श्वभूमीवर करमाळा आगार प्रमुख अश्विनी किरगत यांच्या मार्गदर्शना खाली बस स्थानकात कोरोना ला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

उपाययोजनांची माहिती देताना आगारव्यवस्थापक अश्विनी किरगत म्हणाल्या की, सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे

शंभुराजे फरतडे ✍

महामंडळ देखील आपल्या जबाबदारीचे भान ठेवून बस स्थानकाची वारंवार स्वच्छता करत आहे. संपूर्ण स्टँडचे दिवसातून दोन वेळेस निर्जंतुकीकरण केले जात आहे. सर्व बसेस कामगिरीवर वापरण्यापूर्वी निर्जंतुकिरकण करून वापरल्या जात आहेत.तसेच प्रत्येक फेरी वरून परत आल्यावर स्थानकावरच निर्जंतुकीकरण केले जात आहे. करमाळा व जेऊर येथील कंट्रोल केबिन मध्ये सनीटाईझर ठेवलेले असून गरज पडल्यास प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. सर्व चालक वाहकाना मास्क वापरणे अनिवार्य केलेले आहे.तसेच, सर्व प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी याना देखील मास्क वापरणे अनिवार्य केलेले आहे. कोरोना विरुद्ध च्या या महामारीत महामंडळ आपला वाटा उचलत आहे. यामध्ये प्रवाशांनी देखील आपले योगदान द्यायला हवे,असे आवाहन ही किरगत यांनी केले आहे बस मधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असुन . तसेच बसस्थानकावर येणाऱ्या सर्वांना मास्क वापरणे अनिवार्य आहे. मास्क व्यवस्थित वापरावा. खराब झालेले मास्क स्टँड वर कोठेही न टाकता कचराकुंडीतच टाकावेत. विनामास्क असणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते.असा इशाराही किरगत यांनी दिले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

त्यामुळे सर्व प्रवाशांनी मास्क वापरावा व आपले राष्ट्रीय आरोग्य जपण्यासाठी महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts