विधान सभा निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने संजयमामा शिंदे याचे आमदार होण्याचे स्वप्न साकार झाले होते, हे सर्वश्रुत आहे ,जयवंतराव जगताप यांनी पाठिंबा दिला नसता तर विधान सभा निवडणुकीत वेगळे चित्र पहावायस मिळाले असते हे जगजाहीर आहे .विधान सभा निवडणुकीनंतर माजी आमदार जयवंतराव जगताप व आमदार संजयमामा शिंदे यांनी हातात घालुन तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे व जातेगाव येथे मोठा विजयी मेळावा देखील घेतला आहे, त्याच बरोबर जयवंतराव जगताप हे जाहीर पणे आमदार संजय शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत असल्याने जगताप/शिंदे युतित सर्व काही आलबेल आहे असे बोलले जात होते मात्र कंदर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व जगताप गटाचे खंदे समर्थक आण्णासाहेब पवार यांच्यावर शिंदे ,बागल,व पाटील या तिन्ही गटाने एकत्र येत अविश्वास ठराव जिंकुण आमदार संजयमामा शिंदे गटाने माजी आमदार जयवंतराव जगताप गटाला जबरदस्त झटका दिला आहे
शिंदे- जगताप युतीला या निमित्ताने तालुक्यातील पहिला सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे कंदर येथील वि.का.सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन, व शिंदे- जगताप युतीसाठी सर्वात जास्त प्रयत्नशिल असणारे जगताप गटाचे खंदे समर्थक विद्यमान चेअरमन अण्णासाहेब पवार यांच्या वर शिंदे गटाने बागल, पाटील गटाच्या सहकार्याने अविश्वास दाखल करून तो मंजूर करुण घेतल्याने युतीत मोठे वादळ निर्माण झाले आहे कंदर सोसायटी चेअरमन निवडीवरून निर्माण झालेले हे वादळ पेल्यातील वादळ ठरणार की उग्र रुप धारण करणार या कडे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत
मि जयवंतराव जगताप याचा कट्टर समर्थक असुन विधान सभा निवडणुकीत संजयमामा शिंदे व जयवंतराव जगताप याची युती घडवून आण्यासाठी प्रमाणीक प्रयत्न केले आहेत व त्याला यश देखील आले मात्र गावपातळीवरील राजकारणात शिंदे गटाचे नेतृत्व करीत असलेल्या लोकांनी विश्वास घाताचे राजकारण केले आहे अखेर मि 'भाऊ' व मामांच्या सांगण्यावरून राजीनामा दिला आहे,मामांनी सांगुण देखील पाटिल व बागल यांना सोबत घेऊन शिंदे गटाने चाल खेळली आहे, आमचे नेते जयवंतराव जगताप यांच्याशी बोलुन पुढील निर्णय घेवु -आण्णासाहेब पवार
आण्णासाहेब पवार हे जगताप यांचे खंदे समर्थक असल्याने व बागल पाटील यांच्या मदतिने जगताप समर्थकाचा पराभव केल्याने हा पराभव जगताप गटाच्या वर्मी बसला आहे असे बोलले जात आहे कंदर विविध कार्यकारी सेवा सोसायटीत जगताप, बागल युतीने १३ पैकी ७ जागेवर विजय मिळवला होता तर संजय शिंदे गटाला ५ व पाटील गटाला १जागा मिळाली होती आज अविश्वास ठराव वेळी शिंदे गटाने बागल व पाटील यांना सोबत घेऊन १० विरूद्ध ३ मतांने अविश्वास ठराव जिंकला आहे. शिंदे गट जगताप गटा सोबत राहिला असता तर अविश्वास ठराव नामंजूर झाला असता
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.