loader
Breaking News
Breaking News
Foto

दंड घ्या व मास्क द्या - बाळासाहेब होसिंग

वाढत्या कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी साठी मास्क वापरणे आवश्यक आहे सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा परंतु पोलीस प्रशासनाकडून दंडाच्या स्वरूपात अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जाते, ती रक्कम कमी करून नाम मात्र दंड घेऊन त्यांना पावती करून मास्क देखील भेट द्यावा जेणेकरून चुक लक्षात येवुन तो व्यक्ती कायम स्वरुपी मास्क वापरेल व कोरोनाला अटकाव घालणे सोपे होईल त्यामुळे नाममात्र दंड करुन मास्क देखील भेट द्यावा आशी मागणी भाजपा उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांनी केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

प्रशासनाकडून मास्क वापरण्याबाबत आवाहन करूनही बहुतांश नागरिक मास्कचा वापर करत नाहीत हे चुकीचे आहे असेही होसिंग यांनी स्पष्ट केले आहे

✍ चौफेर प्रतिनीधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क हा आता दैनंदिन जीवनातील एक भाग बनला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास प्राधान्य दिले जावे. कोरोनाच्या संकटात अजूनही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळत आहेत. तर काही जणांचा मास्क हा गळ्यात अडविलेला दिसतो. परंतु मास्क हा केवळ कोरोनासाठीच नव्हे, तर विषाणूजन्य आजारांसाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे मास्क चा वापर करावा असे ' आवाहन होसिंग यांनी केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts