येथील शिवसेना उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचा वतीने "आरोग्याचा महायज्ञ सोहळा" आयोजित करण्यात आला आहे अशी माहीती शिवसेना प्रणीत शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या शिवजयंतीनिमित्त ३१ मार्च ला सकाळी नऊ वाजता छत्रपती चौक येथे भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक होणार असून या वेळी माजी आमदार नारायण आबा पाटील यांची प्रमुख उपस्थितीती असणार आहे यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, सभापती गहिणीनाथ ननवरे, उपसभापती दत्ता सरडे, बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजी बंडगर, मराठा महासंघचे तालुका अध्यक्ष दिनेश घोलप, युवा नेते सुनील सावंत, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, मनसे तालुका अध्यक्ष संजय घोलप, आरपीआयचे नागेश कांबळे, जि.प. सदस्य बिभिषण आवटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, नगरसेवक अतुल फंड, अल्ताफशेठ तांबोळी, प्रविण जाधव, माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ, महादेव फंड, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड , सुजित बागल, महादेव फंड, ॲड.कमलाकर वीर, मनसे शहराध्यक्ष नाना मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
२६ मार्च ला नेत्ररोग तपासणी शिबीर व चष्मे वाटप कार्यक्रम कुटीर रूग्णालय येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे उपस्थित राहणार आहेत. २७ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ५ यादरम्यान वरद हॉस्पिटल, घोलपनगर येथे महिलांची मोफत थायरॉईड तपासणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना महिला नेत्या शैलाताई गोडसे, जि.प.सदस्या सवितादेवी राजेभोसले, आशाताई टोणपे यांचे हस्ते होणार आहे.प्रमुख पाहूण्या म्हणून शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियंका गायकवाड यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश चिटणीस पुजा झोळ, तालुका अध्यक्षा नलिनी जाधव, शहराध्यक्षा जयश्री कांबळे, भावनाताई गांधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
२८ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ५ या वेळेत पवार हॉस्पिटल, करमाळा येथे मोफत मूळव्याध तपासणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन (मुंबई) डॉ.अशोक पवार, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, डॉ.रविकिरण पवार यांचे हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांचेसह शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख शाहूदादा फरतडे, माजी शहरप्रमुख सिकंदर जाधव, गजानन ननवरे, राजेंद्र काळे, संजय शिलवंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. २९ मार्च ला सकाळी ११ वाजता छत्रपती चौक येथे अपंग व्यक्तीला मोफत साहित्य वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केमचे माजी सरपंच अजित तळेकर, तरटगाव चे सरपंच डॉ.अमोल घाडगे, पंचायत समिती माजी सभापती शेखर गाडे, सचिन गायकवाड, सचिन काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.