करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या निवडी कधी होणार या वर दोन महिन्या पासुन चर्चा सुरु होती ,पक्ष आडचणीत आसताना ग्रांउड लेवल वर काम करणाऱ्यां सामान्य कार्यकर्त्यांकडून पक्षाला उभारी देण्याचे काम झाले कोणताही मोठा नेता पाठिशी नसताना या निष्ठावंत मावळ्यांनी राष्ट्रवादीचा आवाज बुलंद केला होता या निष्टेच्या जोरावरच युवक च्या पदासांठी हे कार्यकर्त्ये इच्छुक होते मात्र ऐनवेळी पदासाठी मुलाखती न दिलेल्या उमेदवाराच्या निवडी झाल्याने निष्ठावंताना डच्चु मिळाला आहे, या निवडी कोणाच्या शिफारसी ने झाल्या हे गुलदस्त्यात असले तरी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आ संजयमामा शिंदे यांनी डावपेच आखले असल्याचे बोलले जात आहे युवक च्या निवडीनंतर राष्ट्रवादी फादर बाॅडी मध्ये देखील फेर बदल होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत
करमाळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी जाहीर केल्यानंतर निवड करत असताना पक्षाच्या अडचणी काळात पक्षाचे काम करत पक्ष मजबूत करण्याची भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून वशिलेबाजी करून निवडी करण्यात आल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तालुका अध्यक्ष पदासाठी मुलाखती दिलेल्या ७ सदस्या पैकी ६ जणांनी तसेच तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत साखरे यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे पत्र दिले असताना देखील जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मनमानी करत तालुकाअध्यक्ष पदासाठी मुलाखतीस न आलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काडीमात्र संबध नसलेल्या लोकांची करमाळा तालुकाअध्यक्ष व तालुका कार्याध्यक्ष निवडी केल्याने नाराजीचा सूर आणखीनच वाढल्याचे चित्र दिसत आहे.महेश काळे यांना जिल्हा उपाध्यक्ष पदावरून दूर करत केवळ जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त करून पक्षाच्या सोबत कायम निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या सोबत असणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला संधी न देता केवळ पक्ष सत्तेत असल्याने इतर गटातील कार्यकर्त्यांनी वशिलेबाजी करत पद मिळवून घेतली असल्याच चित्र दिसत आहे. याबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता या निवडी बाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांशी भेट घेऊन सर्व गोष्टी कानावर घालणार असल्याचे सांगितले .यानंतरही न्याय न मिळाल्यास थेट पवार साहेबांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडणार असल्याचं निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सांगितले असुन वेळ पडल्यास सामुहिक राजीनामे देणार असल्याचे सांगीतले आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.