loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळयात युवा सेनेने केला नितेश राणेंचा पुतळा जाळुन निषेध

भाजपा चे आमदार नितेश राणे यांनी युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर सचिन वाझे प्रकरणात केलेल्या गलिच्छ आरोपामुळे संपूर्ण राज्यात युवा सैनिक व शिवसैनिकात संतापाचे वातावरण असून करमाळा तालुक्यात देखील राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवसैनिकांनी नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन व दहन करुन निषेध व्यक्त केला.या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे ,भरत आवताडे, माजी शिवसेना शहरप्रमुख संजय शिलवंत, शंभुराजे फरतडे उपस्थित होते.

सदर आंदोलना वेळी बहुसंख्य युवा सैनिक उपस्थित होते

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या प्रसंगी बोलताना विशाल गायकवाड म्हणाले कि, राणे यांनी ठाकरे कुटुंब व युवा सेनेच्या नेत्यांवर टिका करण्याऐवजी आपली कोकणातील राजकीय प्रतिष्ठा संभाळण्यासाठी लक्ष द्यावे , तसेच आगामी काळात शिवसेना राणे यांचे राजकीय अस्तित्व संपवल्या शिवाय राहणार नसल्याचे सांगितले. या आंदोलनात उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, हनुमंत रंदवे, साई फडतरे, सागर गायकवाड, सागर कोकाटे, चक्रधर पाडुळे नरेंद्र भिंगारे, तुषार नवले, अविनाश भिसे, मयुर यादव, प्रसाद निंबाळकर, आदि युवा सैनिक उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी युवा सेना झिंदाबाद, वरुण सरदेसाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है , या बरोबरच राणे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts