loader
Breaking News
Breaking News
Foto

साडे गावचा सुपुत्र झाला दोन वेळा फौजदार ! शेतकरी कुटुंबातील निवास रोकडे यांची यशोगाथा .

बारमाही दुष्काळी भाग,अतिशय हालाखीची परस्थिती,दुष्काळा मुळे "पिकलं तरच विकलं" अशी अवस्था असल्याने घरची परस्थीती बेताचीच,शिक्षणासाठी फी भरणे देखील मुश्किल असताना साडे येथील निवास झुंबर रोकडे या युवकांने जिद्द व चिकाटीच्या जोरावर दोन वेळा फौजदार होण्याचा बहुमान मिळवला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवास रोकडे यांच प्राथमिक शिक्षण साडे येथील जि .प शाळेत तर माध्यमिक शिक्षण साडे हायस्कुल साडे येते व उच्चं माध्यमिक शिक्षण भारत हायस्कुल जु कॉलेज जेऊर येथे झाले

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

2010 साली नवी मुबंई पोलीस दलात भरती झाले पण आई वडील यांचे कष्ट व अपला मुलगा आधिकारी व्हावा हि आई वडिलांची इच्छा निवास यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे पुन्हा नव्या जोमाने MPSC ची तयारी केली 2016 ला त्यांची गुणवत्तेनुसार नुसार निवड झाली तेव्हा त्याचीं 304 रँक होती काही प्रशासकीय अडचणी मुळे त्यांना प्रशिक्षणास पाठविण्यात आले नव्हते त्यांनी 2017 ची . एम .पी. एस. सी. पुन्हा परीक्षा दिली होती त्याचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला यात त्यांची महाराष्ट्रातून 55 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन निवड झाल्याने सलग दोन वेळा पोलीस उप. निरिक्षक पदी निवड होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

. प्रयत्न जिद्द चिकाटी आणि सातत्य याच्या जोरावर यश मिळवणं कस शक्य आहे हे त्यांनी दाखून दिले त्यांच्या सलग दोन वेळा निवडीच्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts