आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील पाचशे ते सहाशे कर्मचाऱ्यांच्या साठ महिन्याच्या पगारी कारखाना प्रशासनाने थकवल्या आहेत या कामगरांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेणार असुन कामगर,मनसे पदाधिकारी शिष्टमंडळ व राज ठाकरे यांच्यात बैठक होणार असून कामगारांचा प्रश्न आता थेट 'कृष्णकुंज 'या मनसेच्या 'राज' दरबारी पोहचणार आहे!
आदिनाथ कारखान्यावर रश्मी बागल यांचा सत्ता असुन रश्मी बागल या राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्या खास समर्थक म्हणून ओळखल्या जातात मात्र 2019 च्या विधान सभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'शिवबंधन' बांधले आहे. कारखाना वाचवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत असुन निवडणुकीनंतर एक महिन्यात सर्व पगारी जमा करु आशा वलग्ना बागल बहिण भावंडानी केल्या होत्या मात्र कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन देखील कारखाना प्रशासनास पाझर फुटला नाही उलठ आत्महत्या ग्रस्तांच्या वारसास दिलेले चेक बाउन्स झाल्याने कामगारांच्या जखमेवर मिठ चोळल्याचे प्रकार घडले आहेत.
थकीत पगारी मिळविण्यासाठी कामगारांनी सहा महिने उपोषण केले तरी न्याय मिळाला नाही आज कामगारांची उपासमार सुरु असुन कामगारांच्या कुटुंबीयांना दुसर्याच्या शेतात खुरपायला जावे लागत आहे. सत्ताधारी मात्र लाखोंच्या एसी गाडीत फिरत आहेत, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे,कारखाना चालवायला घेणारे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे नातु आहेत, तर कारखान्यावर सत्ता असलले शिवसेनेत आहेत मग कामगारांच्या पगारी का होत नाहीत, का आणखी कामगारांनी आत्महत्या कराव्यात आशी यांची अपेक्षा आहे असा अक्रमक सवाल संजय घोलप यांनी केला असुन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही थराला जावुन आंदोलन करु असा इशारा दिला घोलप यांनी दिला आहे
सध्या या कारखान्यास बँकेने जप्तीची नोटीस काढली असुन राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांचे नातु आमदार रोहित पवार यांनी हा कारखाना करार करुन चालवण्यास घेतला आहे. कारखाना चालवण्यास घेण्या आगोदर आमच्या पगारी करा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.परंतु अजुनही (नामधारी?) चेअरमन धनंजय डोंगरे,संचालिका रश्मी बागल, यांनी कामगारांना न्याय देण्यासाठी कोणतीच ठोस भुमीका घेतलेली नाही. अखेर या कामगारांना न्याय मिळवुन देयचाच असा चंग करमाळा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांधला असुन तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांच्या नेतृत्वाखाली आज मनसेच्या शिष्टमंडळाने कामगारांची भेट घेऊन सर्व व्यथा जाणुन घेतल्या असुन लवकरच जिल्हा संघटक व सहकार शॅडो मंत्री दिलीप बापु धोत्रे ॲड,मा.किशोरजी शिंदे ॲड .रुपालीताई ठोंबरे-पाटिल जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी गिड्डे ठाणे शहर सचिव अनिल माने यांना सोबत घेऊन कामगर व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात 'कृषकुंज' या राज ठकारे यांच्या निवासस्थानी बैठक घेवुन पुढील दिशा ठरवणार असल्याचे तालुका अध्यक्ष संजय घोलप यांनी सा चौफेर शी बोलताना सांगीतले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.