loader
Breaking News
Breaking News
Foto

पुर्व भागातील शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का? भारनियमन शेतकऱ्यांच्या मुळावर ,वाडीवस्तीवरील सिंगल फेज गायब!

पुर्व भागातील शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही? या भागातील शेतकऱ्यांचा फक्त मतदाना पुरताच वापर होणार का? आमदार खासदार यांना पुर्व भागातील शेतकऱ्यांचा टाहो ऐकु येणार का नाही? असे एक ना अनेक सवाल अता पुर्व भागातील हिवरे,हिसरे,कोळगाव, निमगाव,गौंडरे, मिरग्व्हाण या गावातुन विचारले जात आहेत ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीत मुळे कंबरडे मोडलेला शेतकरी सावरत आसतानाच महावितरण च्या भारनियमना मुळे त्रस्त झाला आहे . सध्या धरणात पाणी साठा उपलब्ध आहे आठ तास मिळणारी विज भारनियमनमुळे सहा तास व सहा तासा वरुन चार तासा वर आली आहे. अपुऱ्या दाबा मुळे विजपुरवठा, वारवंवार खंडित होणारा विजपुरवठा या मुळे शेतकऱ्यांच्या विदुत पंपा बरोबर रोहित्र जळण्याच्या घटना घडत आहेत. शेतीपंपाच्या विजेसाठी भारनियमन व धरसोड पणा सुरु असताना सबस्टेशन वर लोड येत असल्याचे कारण देत पुर्व भागातील हिवरे,हिसरे,कोळगाव, निमगाव, गौंडरे,आवाटी,मिरग्व्हाण या गावांच्या वाडीवस्तीवरील सिंगल फेज लाईट पुर्ण पणे बंद केल्या असुन शेकडो वाड्या वस्त्या अंधारात चाचपडत आहेत. कोरोना नंतर शाळा सुरु झाल्या आहेत, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी विजेची गरज आहे, सद्या रॉकेल मिळत नसल्याने तेलाचे दिवे जाळावे लागत आहेत. मध्यंतरी मिरग्व्हाण येथे दिव्यातील वात उंदराने पळवल्याने छपराच्या घराला आगा लागुन लाखो रुपयाचे नुकसान झाले व म्हतवाची कागद पत्र जळुन खाक झाली आहेत. छपरांच्या घरात जिव मुठीत घेवुन चिमुकल्यांसह शेतकरी रात्रीच्या रात्री जागुन काढीत आहेत, विंचु साप याच्या पासुन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवाला धोका झाल्यास जबाबदार कोण याचे उत्तर कोण देयला तयार नाही महावितरण कडुन मात्र तुमचे कनेक्शन आहेत का? बिलं भरली आहेत का? अशी दमदाटी करुन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

[या कारणा मुळे होतेय भारनियमन] ___________________________ कोळगाव येथील 33 केव्ही चे सब स्टेशन असुन या वरील 3/15 चा ट्रान्स्फर जळाला आहे सध्या गौंडरे आवाटी साठी 1फिडर,निमगाव साठी 1फिडर,कोळगाव पंप हाउस साठी 1 फिडर,व हिवरे- हिसरे साठी 1 फिडर अशा चार फिडरवरुन सहा -सहा तास विजपुरवठा केला जात आहे मात्र 3/15 चा ट्रान्स्फर जळाल्याने सबस्टेशन वर लोड येथील आहे त्यामुळेच सिंगल फेज संपूर्ण पणे बंद केली आहे,तर भारनियमन देखील वाढवले आहे या ठिकाणी 05चा ट्रान्स्फर बसवला तर भारनियमन व सिंगल फेज चा प्रश्न संपु शकतो तरी पाच चा ट्रान्स्फर बसवावा अशी मागणी जोर धरत आहे

आठ दिवसा पासुन पुर्व भागातील वाड्या वस्त्या आंधारात चाचपडत आहेत

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

[का जळाला ट्रान्स्फर?] ______________________ या बाबत अधीक चौकशी केली असता 3/15 चा ट्रान्स्फर मधुन बारा बॅलर तेल गळती झाल्याने ट्रान्स्फर जळल्याचे सांगण्यात आले परंतु तेल गळती झाली का आणखी गौडबंगाल आहे हे मात्र समजु शकले नाही

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार, खासदार, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या पैकी एकही लोकप्रतिनिधी आवाज उटवायाला तयार नाहीत महावितरण च्या आडमुठ्या भुमिके विरुध्द आवाज उठवण्यासाठी राजकीय जोडे बाजुला ठेवुन युवकांमधुन तिव्र आंदोलन हाच पर्याय असल्याचे युवकांमधुन बोलले जात आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts