पुर्व भागातील शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही? या भागातील शेतकऱ्यांचा फक्त मतदाना पुरताच वापर होणार का? आमदार खासदार यांना पुर्व भागातील शेतकऱ्यांचा टाहो ऐकु येणार का नाही? असे एक ना अनेक सवाल अता पुर्व भागातील हिवरे,हिसरे,कोळगाव, निमगाव,गौंडरे, मिरग्वाहण या गावातुन विचारले जात आहेत ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीत मुळे कंबरडे मोडलेला शेतकरी सावरत आसतानाच महावितरण च्या भारनियमना मुळे त्रस्त झाला आहे . सध्या धरणात पाणी साठा उपलब्ध आहे परंतु भारनियमन मुळे आठ तास मिळणारी विज सहा तास व सहा तासा वरुन चार तासा वर आली आहे. कोरोना नंतर शाळा सुरु झाल्या आहेत, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी विजेची गरज आहे, सद्या रॉकेल मिळत नसल्याने तेलाचे दिवे जाळावे लागत आहेत. मध्यंतरी मिरग्व्हाण येथे दिव्यातील वात उंदराने पळवल्याने छपराच्या घराला आगा लागुन लाखो रुपयाचे नुकसान झाले व म्हतवाची कागद पत्र जळुन खाक झाली आहेत. छपरांच्या घरात जिव मुठीत घेवुन चिमुकल्यांना घेवुन शेतकरी रात्री जागुन काढीत आहेत, विंचु साप याच्या पासुन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवाला धोका झाल्यास जबाबदार कोण याचे उत्तर कोण देयला तयार नाही महावितरण कडुन मात्र तुमचे कनेक्शन आहेत का? बिलं भरली आहेत का? अशी दमदाटी करुन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत
___________________________ [या कारणा मुळे होतेय भारनियमन] कोळगाव येथील 33 केव्ही चे सब स्टेशन असुन या वरील 3/15 चा ट्रान्स्फर जळाला आहे सध्या गौंडरे आवाटी साठी 1फिडर,निमगाव साठी 1फिडर,कोळगाव पंप हाउस साठी 1 फिडर,व हिवरे- हिसरे साठी 1 फिडर अशा चार फिडरवरुन सहा -सहा तास विजपुरवठा केला जात आहे मात्र 3/15 चा ट्रान्स्फर जळाल्याने सबस्टेशन वर लोड येथील आहे त्यामुळेच सिंगल फेज संपूर्ण पणे बंद केली आहे,तर भारनियमन देखील वाढवले आहे या ठिकाणी 05चा ट्रान्स्फर बसवला तर भारनियमन व सिंगल फेज चा प्रश्न संपु शकतो तरी पाच चा ट्रान्स्फर बसवावा अशी मागणी जोर धरत आहे
गेल्या आठ ते दहा दिवसा पासुन पुर्व भागातील वाड्या वस्त्या अंधारात चाचपडत आहेत
----------------------------- का जळाला ट्रान्स्फर? या बाबत अधीक चौकशी केली असता 3/15 चा ट्रान्स्फर मधुन बारा बॅलर तेल गळती झाल्याने ट्रान्स्फर जळल्याचे सांगण्यात आले परंतु तेल गळती झाली का आणखी गौडबंगाल आहे हे मात्र समजु शकले नाही ___________________
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.