loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने सुरज हनपुडे यांचा धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या वतिने सत्कार

गौंडरे येथील युवक सुरज सुभाष हनपुडे हा भारतीय सैन्य दलात भरती झाला असुन बेळगाव येथील एक वर्षाचे ट्रेनिंग संपवून उत्तराखंड येथे देशसेवेसाठी रुजु होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निस्सीम देशभक्ती मनात असलेल्या सुरज ने खडतर परिस्थितीत यश संपादन केल्याने धर्मवीर संभाजी विद्याल गौंडरे यांच्या वतीने आज सत्कार आयोजित करण्यात आला होता.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

या वेळी संस्थेचे सचिव हरिदास काळे म्हणाले की सुरज ने सैन्यात भरती होवुन देशसेवा करण्याचा घेतलेला निर्णय सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद असुन आम्हाला सुरज चा अभिमान आहे,तर माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तमराव हनपुडे सर यांनी सुरज याचे कौतुक करताना सुरज हनपुडे यांनी पंचक्रोशीतील युवकां पुढे आदर्श निर्माण केला असून सुरज यांच्याकडुन युवकांनी प्रेरणा घेवुन या भागातून सैन्यात भरती होणारी संख्या वाढवावी असे आवाहन केले तर शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे संस्थापक शंभुराजे फरतडे म्हाणले की, सैनिक सिमेवर जिवाची बाजी लावुन लढत असल्यानेच आपण घरी कुटुंबा समवेत शांत झोपु शकत आहोत ,अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य असलेल्या सैनिकांप्रती व त्यांच्या कुटुंबियां प्रती आदर ठेवणे आपले कर्तव्य असल्याचे सांगत सैन्यात शौर्य गाजवण्यासाठी जवान सुरज हनपुडे यांना शुभेच्छा दिल्या

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सत्काराला उत्तर देताना सुरज हनपुडे म्हाणले की आच विद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारामुळे भारवलो असुन ,आपल्या शाळेचे ,गुरुजनांचे,गावाचे,काळ्या मातीचे ॠण फेडण्यासाठीच सैन्यात भरती झालो असुन युवकांनी सैन्य भरती साठी पुढे येण्याचे आवाहन केले . या वेळी मुख्याध्यापक बापु निळ,सहशिक्षक उत्तम हनपुडे,हरिदास काळे,यशवंत कोळेकर,वैजीनाथ भोईटे,इंद्रजित मुळिक,सुखदेव गिलबिले,संतोष पुराणे,अशोक जावळे, कर्माचारी व्हि .डी निळ ,बापु तांबोळी,श्रीकांत नलबे,प्रकाश साळवे,श्रिमती सुवर्णा नलबे व विद्यार्थी उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts