करमाळा तालुक्यातील शिवसेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी आपण काम करीत असून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील राहिलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे स्पष्ट मत शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी देवी चरणी एक किलो चांदीची तलवार माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते आज अर्पण करण्यात आली या वेळी पाटील बोलत होते .या वेळी सभापती गहिनीनाथ ननवरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे ग्रामीण जिल्हा उप प्रमुख भरत आवताडे युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड देवानंद बागल आदी उपस्थित होते
पुन्हा एकदा तालुका भगवामय करु गेल्या विधान सभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चुकीची माहीती देवुन वैयक्तिक स्वार्थासाठी नारायण पाटील यांची उमेदवारी डावलण्याचे कटकारस्थान करण्यात आले परंतु जनतेनी त्यांना जागा दाखवली आहे , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असुन नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात उभा करु महेश चिवटे [ उपजिल्हाप्रमुख शिवसेना]
वेळी अधीक बोलताना नारायण पाटील म्हणाले कि शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन खाली येत्या काळात शिवसेनेचा झंझावात निर्माण करणार असुन आगामी नगरपालिका,जिल्हापरिषद, पंचायत समिती सह विधासभेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत शिवसेनेकडून विधानसभा लढवण्याचे सुचक विधान माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार असताना शिवसेनेने नारायण पाटील यांची उमेदवारी डावलून रश्मी बागल यांना उमेदवारी बहाल केली होती मात्र शिवसेनेच्या रश्मी बागल यांचा सपाटून पराभव झाला होता व त्यांची तिसऱ्या क्रमांकावर गच्छंती झाली होती या तुलनेत अपक्ष नारायण पाटील यांनी जोरदार लढत देत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती ,पाटील यांना सेनेची उमेदवारी असती तर आज चित्र वेगळे दिसले आसते. नारायण पाटील यांना मिळालेला जनाधार व त्यांनी शिवसेना नेत्यांसोबत ठेवलेला संपर्क पहाता आगामी निवडणुकीत सेनेची सर्व सुत्रे पाटील यांच्या हाती असतील असे आता बोलले जात आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.