loader
Breaking News
Breaking News
Foto

अती वृष्टी मदतीचे तात्काळ वाटप करा अन्यथा आंदोलन करु - शाहुराव फरतडे

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत अणी महापुरामुळे झालेल्या नुकसानीची दुसर्‍या टप्यातील रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी जिल्हाधिकारी यांना पाटवलेल्या निवेदनात दिला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्यातील ३६७३७ शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी २० कोटी २१लाखांची मागणी करण्यात आली होती त्यानुसार पैकी १४ कोटी तालुक्यासाठी प्राप्त झाली होती .या रकमेपैकी शेती पिंकासाठी ९कोटी ८०लाख तर घर पडझड,मयत,जनावरे,शेतजमीन नुकसान यासांठी ४कोटी ६१लाखाचे वाटप झाले आहे

चौफेर प्रतिनिधी ✍

वास्तविक दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या व तेहतीस टक्के नुकसान झालेल्या जिरायत शेतकऱ्यांना दहाहजार,तर फळ बागासाठी पंचवीस हजार मदत जाहीर केली आहे प्रत्यक्षात मात्र कोणाला,दोन हजार,कोणाला पाच हजार,अशीच मदत मिळाली चुकीचे पंचनामे झाल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहीले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

नुकसानीस चार महिने उलटुन सुद्धा अनेक शेतकऱ्यांना फुटकी कवडी सुद्धा मिळाली नाही , निधी उपलब्ध असुन मदतीस चालढकल होत असल्याने शेतकऱ्यांत नारजी आहे आठ दिवसांत जर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा झाला नाही तर तहसील कार्यालयासमोर शिवसेना व शिवप्रताप प्रतिष्ठान च्या वतिने हालगीनाद आंदोलन करु आसा इशारा शाहुराव फरतडे यांनी दिला आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts