केंद्र सरकारकडून सतत वाढवण्यात येणाऱ्या पेट्रोल डिझेल व गॅस च्या किंमती व महागाई विरोधात शिवसैनिकांना राज्यभर तिव्र आंदोलन करण्याचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश होता . राज्यात सत्तेत असलेल्या शिवसनेला आपले अक्रमक्तव सिद्ध करण्याची व भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी असल्याने राज्यासह सोलापूर जिल्ह्यात हे अंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात अक्रमक स्वरुपात पार पडले
करमाळा तालुक्यात असलेली पक्षाची ताकद पहाता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता होती मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांकत असलेल्या हेवेदाव्या मुळे अंदोलना दरम्यान गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले व त्या मुळे आंदोलनाची हवाच निघुन गेली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे,भरत आवताडे,तालुका संपर्क प्रमुख बापुसाहेब मोरे युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियांका गायकवाड ,भावनाताई गांधी यांनी तहसील कचेरी समोर हालगीनाद व चुल पेटवून निषेध व्यक्त केला तर तालुका प्रमुख सुधाकर लावंड ,विधान सभा संघटक संजय शिंदे, शहर प्रमुख प्रविण कटारिया, यांनी या आंदोलनात सहभागी न होता तहसील कार्यालयात जावुन निवासी नायब तहसीलदार श्री जाधव यांना निवेदन देवुन निषेध व्यक्त केला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश असताना सुद्धा एकाच प्रश्नावर शिवसेनेच्या दोन गटाने वेगवेगळी आंदोलने केल्याने आंदोलना पेक्षा अंतर्गत गटबाजीचीच चर्चा शहरात चविने चगळली गेली. विधानसभा निवडणुकीत सेनेशी फारकत घेतलेले माजी आमदार नारायण पाटील त हे देखील सेनेतच असुन पक्षा कडुन सध्या त्यांना पाटबळ दिले जात आहे, तसेच रश्मी बागल,दिग्विजय बागल हे देखील शिवसेनेत आहेत परंतु दोन्ही गटाचे कार्यकते व पदाधकिरी देखील,आंदोलनात सामील झाले नाहीत .
पंचायत समितीत व जिल्हा परिषदेत सेनेची सत्ता आहे असे आसताना पक्ष प्रमुखांच्या शब्दाला हारताळ फासत गटबाजी मुळे आंदोलन फसल्याने पक्षाची नामुश्की झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे पंचायत समिती सभापती,उपसभापति आंदोलनात न फिरकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर परिषदेच्या निवडणुकां तोंडावर असताना गटबाजी पक्षासाठी घातक ठरेल असे बोलले जात आहे. या बाबत चौफेर च्या प्रतिनिधी ने एका पंचायत समिती सदस्याला विचारले आसता पक्षा च्या पदाधिकाऱ्यांकडून विश्वास घेतले जात नाही,अंजेटा काढला जात नाही असे उत्तर दिले. तालुका संपर्क प्रमुख बापुसाहेब मोरे यांना या बाबत विचारपुस केली असता स्थानिक गटबाजीचा व राजकीय परस्थितीचा सर्व आवहाल सेना भवन व मातोश्री वर पाठवणार असल्याचे सांगीतले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.