loader
Breaking News
Breaking News
Foto

विविध सामाजिक उपक्रम राबवून विलासराव घुमरे यांचा वाढदिवस साजरा

करमाळा येथील विद्या विकास मंडळांचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांचा ६६ वा वाढदिवस यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला या मध्ये रक्तदान, वृक्षारोपण, व्याख्यान, व अन्नदान, अशा कार्यक्रमाचा समावेश होता वाढदिवसाच्या निमित्त आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये महाविद्यालयातील एन सी सी, एन एस एस च्या विद्यार्थ्यानी व यशवंत परिवारातील ६६ सदस्यानी रक्तदान केले त्याच बरोबर आदिनाथ चे माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर, मकाई चे चेअरमन दिग्विजय बागल डॉ. सौरभ शिंदे , डॉ . हर्षद माळवदकर , अँड.विक्रांत घुमरे , आशुतोष घुमरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपणासाठी एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थीनी परिश्रम घेतले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

महाविद्यालयात प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र दास व प्रसिद्ध कवी माजी प्राचार्य डॉ . सुरेश शिंदे यांचे व्याख्यानआयोजित केले होते .या वेळी मनोगतामध्ये प्रा लक्ष्मण राख यांनी महाविद्यालयातील सरांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधाचा आढावा घेतला . प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील यांनी अनेक व्यक्तीच्या जडणघडणीत घुमरे सराचा सिंहाचा वाटा जाणवल्याचे स्पष्ट केले. साहित्यिक डॉ. दास सरांनी आपल्या मनोगतामध्ये विलासराव घुमरे सर म्हणजे अनेकजनांच्या जीवन समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व आहे. तुम्ही तुमच्या जीवनात अश्या लोकांशी मैत्री करा की ते घुमरे सरान सारखे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील असे सांगितले .

या वेळी बहुसंख्य विद्यार्थ्यी ,प्राध्यापक, व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

तसेच कवी डॉ. सुरेश शिंदे म्हणाले, की सतत संघर्ष करणारे व सतत दुसऱ्यांना मदत करणारे असे घुमरे सर आहेत . या आधुनिक युगात विज्ञानाच्या वाटेने जावा, पण साहित्याचा अभ्यास जरूर करा कारण साहित्यातून माणूस घडतो त्यांनी मनोगतातून सांगीतले . वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीराम प्रतिष्ठान, करमाळा यांच्यावतीने अनाथ लोकांना अन्नदान करण्यात आले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

महावियालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत प्रा. प्रदिप मोहिते . प्रा.विष्णू शिंदे प्रा. मुक्ता काटवटे प्रा. सौ. सुरेखा जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले .तर सूत्रसंचालन प्रा भोंग सर यांनी केले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts