loader
Breaking News
Breaking News
Foto

एक जरी कनेक्शन कट कराल याद राखा भाजपा अध्यक्ष गणेश चिवटे यांचा महावितरणला ईशारा!

भाजपा करमाळा तालुक्याच्या वतीने लॉकडाऊन काळामध्ये आकारण्यात आलेले अवास्तव वीज बिल माफ व्हावे म्हणून हल्लाबोल व कार्यालयास टाळे ठोक आंदोलन तालुकाध्यक्ष गणेशजी चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले वीज महावितरण कार्यालयासमोर अवाजवी आलेल्या विजबिलाची होळी करण्यात आली व वीज वितरण कार्यालयाचे आधिकारी यांना तश्या आशयाचे निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी तालुका अध्यक्षांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर वीज बिल माफ केले गेले नाही भविष्यात आंदोलन तीव्र करून शासनास धडा शिकवावा लागेल असा गंभीर इशारा या माध्यमातून त्यांनी दिला या वेळी घरगुती, उद्योजक, तसेच शेतकऱ्यांचे कनेक्शन कट कराल तर गाठ भाजपाशी आहे असा इशारा दिला

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तदनंतर जिल्हा सरचिटणीस किरण बोकन यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शासनाचे डोके ठिकाणावर आहे काय असे ठणकावून सांगितले. समारोप प्रसंगी ऍड. भगवान गिरी गोसावी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व भविष्यामध्ये आपण सर्वांना यापेक्षा मोठी आंदोलने करून शासनाला जागे करावे लागेल वेळ प्रसंगी येईल त्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

या प्रसंगी उपस्थित तालुका उपाध्यक्ष रामा ढाणे,काकासाहेब सरडे, महाराष्ट्र चॅम्पियन आपसर जाधव,राज्यपरिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड,ओ बी सी सेलचे तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष आश्विनी भालेराव,माजी महिला शहराध्यक्ष वनिता साळुंखे,रोशेवाडी गावचे भाजपचे ग्रामपंचायत सदस्य संदीप रेगुडे,जयंत काळे पाटील, उदय भालेराव, विशाल साळुंखे ,हर्षद गाडे,अशोक मोरे आदी शेतकरी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी शेकडोच्या संख्येत भाजापा कार्यकर्त्ये उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts