loader
Breaking News
Breaking News
Foto

कुमठे स्थानकावर बस थांबत नसल्याने 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा

भाडळे- कोरेगाव मार्गावर धावणाऱ्या बस कुमठे स्थानकावर थांबत नसल्यामुळे ग्रामस्थांची विशेषतः विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, या बस न थांबवल्यास अथवा कोरेगाव आगाराने दोन दिवसांत पर्यायी बसची व्यवस्था न केल्यास 'रास्ता रोको'चा इशारा कुमठे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने दीनदयाल उपाध्याय ट्रान्स्पोर्ट मालवाहतूक मोटरमालक संघाने दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यासंदर्भात महेश जगदाळे, महेंद्र चव्हाण, अमर जगदाळे, तसेच कुमठे येथील विद्यार्थ्यांनी कोरेगाव आगारास निवेदन दिले आहे.

संचित जगदाळे ✍ (चौफेर प्रतीनिधी सातारा)

त्यात म्हटले आहे, की कोरेगाव ते भाडळे या मार्गावर धावणारी सकाळी साडेदहाची बस कुमठे स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होते. त्यामुळे सकाळी साडेदहाची बस कुमठे स्थानकावर थांबवावी अन्यथा 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात येईल.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

त्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीस आगार व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा महेश जगदाळे यांनी निवेदनात नमूद केलाआहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts