loader
Breaking News
Breaking News
Foto

दुध दर वाढीसाठी भाजपा महायुतीचे रस्ता रोको आंदोलन

करमाळा भाजपा महायुतीचे दूध अनुदान मिळावे व शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळावा ,या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करमाळा-जेऊर रोड बायपास येथे भाजपा जिल्हा नेते राजकुमार पाटील तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा तालुका सरचिटणीस सुहास घोलप, रासपा जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सदस्य अजय बागल ,आरपीआयचे तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे ,यांच्या उपस्थित करण्यात आले. आंदोलनावेळी भाजपा जिल्हा नेते पाटील म्हणाले की कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने पूर्ण विकास थांबविला असून विकासाच्या नावाने सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. "आपल्या राज्याचे मुख्यमंत्री घरात बसूनच राज्य चालवित असून फक्त पंढरपूर व पुण्याला स्वतःच्या गाडीने येण्याचे नाटक केले." आमच्या शेतकरी राजाला योग्य न्याय मिळवून दुधास सरसकट दहा रुपये अनुदान मिळावे, अन्यथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात यापेक्षाही तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही दिला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आंदोलनात दूध सांडून न देता गरजूंना दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच आज १ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, व आण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने आंदोलना ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मुख्यमंत्री घरात बसुन राज्य चालवतात -
राजकुमार पाटील

सा करमाळा चौफेर

यावेळी महायुतीतील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, सरचिटणीस महादेव फंड,जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन ,युवामोर्चा अध्यक्ष सचिन गायकवाड, विस्तारक भगवान गिरीगोसावी, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कुंभार ,ओबीसी सेलचे अध्यक्ष धर्मराज नाळे, किसान मोर्चाचे विजय नागवडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, रासपाचे अंगद देवकते, रयत क्रांती संघटनेचे बाळासो गायकवाड, आरपीआयचे बाळासो टकले, दूध डेअरीचे हणुमंत फरतडे, गाडे, भोंग, शिंदे, भाजपाचे काका सरडे ,मोहन शिंदे ,आजिनाथ सुरवसे ,डॉ अभिजीत मुरूमकर , धनु किरवे,दादा देवकर, मच्छिंद्र हाके ,लक्ष्मण काळे , ऋषी फंड,भैया कुंभार ,सचिन पवार तसेच भाजपा, रासपा, रयत क्रांती संघटना, तसेच महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा भाजपा महायुतीचे दूध अनुदान मिळावे व शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळावा ,या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करमाळा-जेऊर रोड बायपास येथे भाजपा जिल्हा नेते राजकुमार पाटील तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा तालुका सरचिटणीस सुहास घोलप, रासपा जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सदस्य अजय बागल ,आरपीआयचे तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे ,यांच्या उपस्थित करण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts