करमाळा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम पार पडला असुन निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक आरक्षित गावातील सरपंच पदं निश्चित झाली आहेत मात्र, सर्वसाधारण जागेवर मात्र चुरच पहावायस मिळत आहे.काठावर बहुमत असलेल्या गावातील पार्टी प्रमुखांनी दगाफटका टाळण्यासाठी सदस्य सहली वर नेले आहेत,काही गावात मात्र सदस्य पळवल्याने वातावरण तापले आहे
पळवा पळवी बरोबरच सरपंच निवडी आगोदरच विरोधकांचे सदस्य अपात्र करता येतील का याचीही चाचचपणी सुरु झाली आहे,घरपट्टी,अतिक्रमण, तिन अपत्य,शौचालय नसणे या बरोबरच आणखी कायदेशीर बाबी चाचपल्या जात आहेत, सरपंच आपलाच करायचा या इर्षेने गावपातळीवरील वातावरण तापलेले आसतानाच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सरपंच निवडीच्या हालचाली सुरु केल्या आहेत
सरपंच पदाची तारीख निश्चित झाल्यानंतर गावपातळीवरील राजकीय हालचाली वाढल्या असुन आपलाच सरपंच करण्यासाठी कसुन तयारी सुरु आहे. अनेक नेते मंडळीनी आपल्याच ग्रामपंचायती जास्त असल्याचा दावा केला असला तरी सरपंच निवडीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल.
सरपंच पदाच्या निवडणुकी करता जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील दाखवला आसुन ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच /उपसरपंच निवडणुकीची जबाबदरी पार पाडण्यासाठी आध्यासी आधीकारी म्हणून नेमणुका केल्या आहेत
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.